Share Market Todays Updates | Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market : सेन्सेक्स-निफ्टी सुपरहिट, LIC पहिल्याच दिवशी फ्लॉप

आज शेअर बाजारात तेजीचं वातावरण दिसून आलं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सकारात्मक ओपनिंगनंतर शेअर बाजाराने दिवसभरात दमदार कामगिरी केली. सेन्सेक्स आणि निफ्टीने चांगली कामगिरी केली, मात्र त्याच वेळी बहुप्रतिक्षित एलआयसी (LIC) शेअरनं मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. सेन्सेक्स आणि निफ्टी फॉर्ममध्ये असताना एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण नोंदवली गेली. आज दिवसअखेर सेन्सेक्स 1,344.63 अंकांनी अर्थात 2.54 टक्क्यांनी वधारून 54387.69वर बंद झाला, तर निफ्टी 438.15 अंकांनी अर्थात 2.77 टक्क्यांनी वधारून 16,280.45वर बंद झाला. निफ्टी 50 मधील सर्व 50 शेअर्समध्ये वाढ झाली. परंतु शेअर बाजारात आज लिस्टींग झालेला एलआयसी (LIC) शेअर दिवसअखेर 7.77 टक्क्यांनी घसरून 875.25वर बंद झाला. हा शेअर ओव्हरसबस्क्राईब झाल्याने त्याची लिस्टींग प्राईज 949 रूपये निश्चित करण्यात आली होती. परंतु शेअर बाजारात घसरण नोंदवली गेल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली.

तत्पूर्वी तब्बल 6 दिवसांच्या सलग घसरणीनंतर अखेर सोमवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता. आजही शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिलं. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात सुरु झाले. सेन्सेक्स 311.35 अंकांच्या वाढीसह 53,285.19वर सुरु झाला, तर निफ्टी 70.3 अंकाच्या वाढीसह 15,912.60 वर सुरु झाला. दरम्यान आज बहुप्रतिक्षित एलआयसी शेअर्सचे लिस्टींग झालं. मात्र शेअर बाजारात एलआसीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. एलआयसीचा शेअर्स 12 टक्क्यांच्या घसरणीसह सुरु झाला.

LIC शेअरकडून निराशा-

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स आज शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. मात्र शेअर बाजारात एलआयसीची सुरुवात चांगली झाली नाही. एलआयसीचा शेअर्स मोठ्या घसरणीसह 862 वर सुरु झाला. परंतु त्यांनंतर हळूहळू खरेदीदारांची संख्या वाढल्याने सकाळी 10.25 मिनिटांपर्यंत एलआयसीचा शेअर 45.40 अंकांच्या म्हणजेच 4.78 टक्क्यांच्या घसरणीसह 903.60वर ट्रेड करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Tushar Apte Resignation : बदलापुरातील तुषार आपटेंचा अवघ्या २४ तासांत राजीनामा, भाजपने स्विकृत नगरसेवकपद दिल्याने जोरदार टीका

NMMC Election: मेट्रो प्रकल्पासह तुर्भे- खारघर टनेल प्रकल्पांना गती... शिंदे शिवसेनेचा जाहीरनामा, काय लिहिलयं?

Eknath Shinde : नाशिकमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार?

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

SCROLL FOR NEXT