SHARE MARKET sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 57,531.95वर सुरु, निफ्टी 170 अंकांनी घसरला

दोन दिवसांच्या तेजीनंतर आज पुन्हा शेअराची सुरुवात बाजारात घसरणीने झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर आज पुन्हा शेअराची सुरुवात बाजारात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 379 अंकांच्या घसरणीसह 57,531.95 वर सुरु झाला, तर निफ्टी 149.85 अंकांच्या घसरणीसह 17,242.75वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील फक्त 5 शेअर्स सकारात्मक ओपनिंग दिले तर 44 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाली. एका शेअरमध्ये वाढ अथवा घट झाली नाही. HCLTECH, ONGC, COALINDIA, TATASTEEL, JSWSTEEL या पाच शेअर सकारात्मक ओपनिंग देऊ शकले.

गुरूवारी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. हेवी वेट शेअर्ससोबतच सगळ्याच शेअर्स मध्ये गुरूवारी खरेदी दिसून आल्याने हा तेजीचा माहौल होता. दिवसा अंती सेन्सेक्स 874.18 अंकांनी अर्थात 1.53 टक्क्यांनी वाढून 57,911.68 वर बंद झाला. तर निफ्टी 256.05 अंकांनी म्हणजेच 1.49 टक्क्यांनी वाढून 17,392.60 वर बंद झाला.

बऱ्याच काळानंतर बाजारात बुल्सचे कमबॅक दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटिजचे के एस रंगनाथन यांनी म्हटले. एनर्जी सेक्टरने बाजाराला चांगली साथ दिली. ग्रॉस आणि रिफायनिंग मार्केटमध्ये चांगली वाढ दिसून येण्याची आशा असल्याचेही ते म्हणाले. ऑटो सेक्टरसह सगळे सेक्टरल इंडेक्स हिरव्या चिन्हात बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT