share market
share market sakal media
अर्थविश्व

Share Market: आज कोणत्या 10 शेअर्सवर फोकस करावं? वाचा शेअर बाजाराचा कसा असेल मूड

शिल्पा गुजर

Share Market Pre Analysis: 25 मार्च अर्थात शुक्रवारी मागच्या आठवड्यातल्या तेजीला ब्रेक लागला. जियोपॉलिटकल तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एफआयआयची विक्री दिसून आली, ज्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि चीनमधील कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 501.73 अंकांनी म्हणजेच 0.86 टक्क्यांनी घसरून 57,362.2 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 134.05 अंक म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 17,153 वर बंद झाला आहे.

जर आपण वेगवेगळ्या इंडेक्सवर नजर टाकली तर निफ्टी मीडिया इंडेक्स 7 टक्क्यांनी वाढला. निफ्टी मेटल इंडेक्स 5 टक्‍क्‍यांनी तर ऑइल अँड गॅस 3 टक्‍क्‍यांनी वधारला आहे. दुसरीकडे, निफ्टी एफएमसीजी 3.4 टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे, निफ्टी बँक निर्देशांक 2.8 टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात, FII ने भारतीय बाजारात 5,344.39 कोटी रुपयांची विक्री केली तर DII ने 2,820.72 कोटी रुपयांची खरेदी केली. दुसरीकडे, मार्च महिन्यात आतापर्यंत FII ने 46,961.57 कोटी रुपयांची विक्री केली आहे, तर DII 34,440.74 कोटी रुपयांची खरेदी करत आहे.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता यामुळे बाजारावर परिणाम होत असल्यचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. येत्या आठवड्यातही ही समस्या कायम राहू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. जर आपण निर्देशांकाचा विचार केल्यास निफ्टी 17,000-17,350 च्या दरम्यान फिरत आहे. दोन्ही बाजूने येणारा ब्रेक मार्केटची दिशा स्पष्ट करेल. अशा परिस्थितीत, निवडक स्टॉक्स आणि सेक्टर्सवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

निफ्टीला 50-दिवस SMA अर्थात 17400 च्या आसपास सतत विक्रीचा दबाव असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. निफ्टीने विकली फ्रेमवर एक स्मॉल बियरिश कँडल तयार केली आहे. जी त्यात आणखी कमजोरी येण्याचे संकेत देत आहेत. जोपर्यंत निफ्टी 17325 च्या खाली व्यवहार करत आहे, तोपर्यंत येत्या काळात कमजोरी येण्याची शक्यता असेल आणि निफ्टी 17000 च्या पातळीला स्पर्श करू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. कमजोरी आणखी वाढल्यास निफ्टी 16900-16870 च्या पातळीवरही जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टीने 17000 ची पातळी ओलांडून ताकद दाखवली, तर 17400-17500 ची पुलबॅक रॅली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस? (Which 10 shares will you focus on?)

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

रिलायन्स (RELIANCE)

एशियन पेंट्स (ASIANPAINTS)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

टाटा पॉवर (TATAPOWER)

श्रीराम टान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANFIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट (Share Market) किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT