Zomato Shares sakal
अर्थविश्व

Zomato Shares : झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणुकदारांनी आता काय करावे ?

बुधवारी झोमॅटोचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक घसरून 50 रुपयांच्या खाली आले.

सकाळ डिजिटल टीम

Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या (Zomato) शेअर्समधील चढ-उतार संपतच नाहीत. बुधवारी झोमॅटोचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक घसरून 50 रुपयांच्या खाली आले. गेल्या वर्षी 27 जुलै 2022 रोजी त्याचे शेअर्स 40.55 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर होते.

आता ते बीएसईवर 8.25 टक्क्यांनी घसरून 47.80 रुपयांवर बंद झाले. इंट्रा-डेमध्ये झोमॅटोचे शेअर्स 44.35 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. त्याची संपूर्ण मार्केट कॅप 40,877.34 कोटी रुपये आहे. (share market Zomato Shares down investors should read this)

अलीकडेच झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांनी कंपनी सोडली. कंपनीचे सह-संस्थापक किंवा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या लोकांनी कंपनी सोडल्याची ही पहिलीच घटना नाही.

यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये रो-संस्थापक मोहित गुप्ता यांनीही कंपनी सोडली होती. झोमॅटोचे नवीन उपक्रम प्रमुख आणि माजी अन्न वितरण प्रमुख राहुल गंजू यांनीही नोव्हेंबरमध्येच कंपनी सोडली. इंटरसिटी लीजेंड्सचे प्रमुख सिद्धार्थ झंवर यांनीही कंपनी सोडली. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींनी कंपनी सोडल्याचा परिणाम होत असल्याचे लक्षात येत आहे.

गेल्या वर्षी 25 जानेवारी 2022 रोजी झोमॅटोचे शेअर्स 100.50 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. यानंतर, पुढील सहा महिन्यांत, ते 60 टक्क्यांनी घसरले आणि 27 जुलै 2022 रोजी 40.55 रुपयांच्या विक्रमी पातळीवर घसरले. यानंतर रिकव्हरी दिसून आली मात्र चढ-उतार सुरूच राहिले.

झोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेचे वातावरण आहे. बाजारातील तज्ज्ञ झोमॅटोबाबत पॉझिटीव्ह आहेत. अशात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एडलवाईसने यावर बाय रेटींग देत 85 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

U19 Asia Cup: दिवाळीच्याच दिवशी India vs Pakistan सामन्याचा धमाका; भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

SCROLL FOR NEXT