stock market
stock market 
अर्थविश्व

Share Market: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स विक्रमी उंचीवर, निफ्टीही तेजीत

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली  Share Market Today: सोमवारी म्हणजे 15 फेब्रुवारी 2021 ला शेअर मार्केट विक्रमी उंचीसह उघडला. बाजार सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स सेन्सेक्स पहिल्यांदाच 52,000 लेवलच्या पुढे गेला. दुसरीकडे निफ्टीही रिकॉर्ड लेवलवर ट्रेंड करत आहे. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) सोमवारी सकाळी 9.36 वाजता 455.38 अकांनी उसळी घेत 51999.68 वर व्यवहार करत होता, दुसरीकडे व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्स 52110.74 वर आला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) इंडेक्स निफ्टी (NIFTY) सोमवारी सकाळी 9.36 वाजता 12.015 अंकांच्या तेजीसह 15283.45 वर व्यवहार करत आहे. 

आज सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास 1086 शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर 376 शेअर्समध्ये घसरण झाली. दुसरीकडे 75 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

या आठवड्याचा शेअर मार्केटसंबंधी विश्लेषकांचे म्हणणं आहे की, या आठवड्यात बाजार प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संकेतांवर आधारित असणार आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीच्या तिमाही परिणामांची घोषणा पूर्ण होत आहे, अशात बाजारात काही घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रुपयाचा विनिमय दर आणि विदेशी संस्थाच्या गुंतवणुकीमुळेही बाजार प्रभावित होऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT