share_20market 
अर्थविश्व

Share Market मध्ये आजही तेजी कायम; कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात बुधवारी पुन्हा जबरदस्त तेजी दिसून आली. निफ्टी 18150 च्या पलीकडे गेला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समध्येही मजबूत तेजी दिसून आली. मिडकॅपमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे 1.5 टक्के वाढ झाली. आजच्या व्यापारात ऑटो, मेटल आणि एनर्जी स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाले. निफ्टी ऑटो निर्देशांक (Nifty Auto Index) 3 टक्क्यांहून अधिक वाढला. त्याचप्रमाणे ऊर्जा, इन्फ्रा, आयटी आणि धातू निर्देशांक (Metal Index) सुमारे 1 टक्क्यांनी वाढले.

बुधवारचा दिवस संपल्यावर सेन्सेक्स 452.74 अंक अर्थात 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 60,737.05 वर बंद झाला. तर निफ्टी 169.80 अर्थात 0.94 टक्क्यांच्या मजबूती वाढीसह 18,161.75 वर बंद झाला.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने आज डेली फ्रेमवर बुलिश कँडल तयार करत 170 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीला आता 18,250 आणि 18,500 च्या दिशेने जाण्यासाठी 18,050 च्या वर राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणतात. दुसरीकडे तळाशी 17947 -17850 या झोनमध्ये सपोर्ट दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

आजचा दिवस शेअर बाजारासाठी कसा असेल ?

शॉर्ट टर्म चार्ट फॉर्मेशन आजही तेजीचे संकेत दिसत आहेत. पण बुधवारच्या जोरदार इंट्राडे रॅलीनंतर निफ्टी 18,250 -18,275 च्या आसपास थांबू शकतो असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. डे ट्रे़डर्सना 18,100 वर सपोर्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. निफ्टी त्यावर गेल्यास 18,200-18,275 च्या लेव्हलवर जाऊ शकतो. दुसरीकडे निफ्टी 18,100 च्या खाली घसरला तर 18,040-17,980 च्या लेव्हलवर येऊ शकतो असेही चौहान म्हणाले.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

आयटीसी (ITC )

पॉवरग्रीड (POWERGRID)

टाटा पॉवर (TATAPOWER)

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (BHEL)

फेडरल बँक (FEDERALBNK )

अशोक लेलँड (ASHOKLEY )

झील (ZEEL)


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT