SIP
SIP esakal
अर्थविश्व

महिन्याला 10 हजार गुंतवून 7 वर्षांत झाले 14.55 लाख, कोणती आहे ही SIP?

शिल्पा गुजर

पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम किंवा ईएलएसएस म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतील, तसेच चांगले रिटर्नही मिळतात. त्यामुळे आयकरातही बचत होते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सवलत मिळू शकते. त्यामुळेच चांगल्या परताव्यासह टॅक्स वाचवायचा असेल, तर टॅक्स सेव्हिंग म्युचुअल फंड (tax saving mutual funds) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.


एसआयपी कॅल्क्युलेटर (SIP Calculator)
युनियन लाँग टर्म इक्विटी फंडाच्या (Union Long Term Equity Fund) माध्यमातून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) गुंतवणूकदारांनी गेल्या 1 वर्षात वार्षिक 10% आणि 5.36% एब्सॉल्यूट रिटर्न मिळवला आहे. गेल्या 2 वर्षांत, या फंडाने 31% वार्षिक परतावा आणि 34% एब्सॉल्यूट रिटर्न दिला आहे. 3 वर्षात हे परतावे अनुक्रमे 25.50% आणि 45% आहेत.

एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर त्याला 1 वर्षानंतर 1.26 लाख रुपयांचा फायदा झाला असता असे व्हॅल्यू रिसर्च वेबसाइटचे म्हणणे आहे. त्याच वेळी 3 वर्षांपूर्वी केलेली हीच गुंतवणूक वाढून 5.20 लाख रुपये झाली असती. याशिवाय जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या फंडवर विश्वास ठेवला असेल तर त्यांना 14.55 लाख परतावा अर्थात रिटर्न मिळाला झाला.

3 वर्षात 1 लाखाचे 1.72 लाख
या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळाले आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदाराने या योजनेत अगदी सुरुवातीला म्हणजे 2 फेब्रुवारी 2012 रोजी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर ही रक्कम 2 फेब्रुवारी 2021 रोजी 3 लाख 22 हजार 500 रुपये झाली असती. तर 5 वर्षांत ही रक्कम 1 लाख 98 हजार झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 1 लाख 72 हजार रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT