Sitharaman back with traditional bahi khata for Budget 2020 
अर्थविश्व

Budget 2020 : निर्मला सीतारामन लाल चोपडी घेऊन परतल्या; ब्रिफकेस का नाही?

वृत्तसंस्था

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज (ता. 1) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मागील वर्षीपर्यंत अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा होती. मात्र, मागील वर्षीपासून सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली.

2019 मधला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन यांच्या हातात लाल कापडात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून मोठ्या प्रमाणत चर्चा झाली होती. यावेळी त्यांच्याकडे 'ब्रिफकेस' नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. यावर्षीही सकाळी सकाळी सीतारामन व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लाल चोपडी घेऊनच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून न आणता लाल चोपडीतून आणावा यामागे कारण आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले, की अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे, त्यामुळे आता दरवर्षी अर्थसंकल्प हा लाल चोपडीतून आणला जाईल. या लाल चोपडीला हिंदीमध्ये भाई-खाता (ledger) असे म्हणतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Maharashtra Latest News Live : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं कार्याचं कौतुक

loan Recovery: थकीत कर्जवसुली प्रकरण तापले; सील केलेल्या मिळकतीत अनधिकृत प्रवेश, पोलिसांत तक्रार

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये मोठी कारवाई; ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, महिला आरोपीवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT