Small Cap Funds Team eSakal
अर्थविश्व

छोटे फंड, मोठा फायदा! 'हे' स्मॉलकॅप फंड पाडतायत पैशांचा पाऊस

5 वर्षात मिळवा 3 पट नफा

सकाळ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

फंड हाऊस स्मॉल कॅप फंडाद्वारे छोट्या आकाराच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा लार्ज आणि मिडकॅपच्या तुलनेत ही श्रेणी (Category) थोडीशी धोकादायक आहे, पण जर तुम्ही योग्य स्कीममध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला शानदार परतावा मिळू शकतो.

स्मॉलकॅप म्युच्युअल फंड (Small cap Mutual Funds): इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये स्मॉलकॅप फंडही समाविष्ट आहेत. फंड हाऊस लहान आकाराच्या (Small Size) कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा लार्ज आणि मिडकॅपच्या तुलनेत ही श्रेणी (Category)जोखमीची आहेच, पण तुम्ही योग्य स्कीममध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. बाजारात काही स्मॉलकॅप म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे 5 वर्षात 3 पटीने वाढवले आहेत. त्याच वेळी, सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणुकदारांनाही तगडा परतावा मिळाला आहे. यापैकीच आम्ही तुम्हाला 5 फंडांची माहिती देत आहोत. त्यांचा परतावा किती मिळेल ते तुम्ही स्वतः तपासू शकता.

एसबीआय स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund) :

एसबीआय स्मॉलकॅप फंडने (SBI Small Cap Fund) 5 वर्षांत 24 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. येथे गुंतवणूकदारांचे पैसे 5 वर्षात तीन पटीने वाढले आहेत, म्हणजे 1 लाख वरून 3 लाख रुपये झाले. 5000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे (SIP) मूल्य या काळात 6 लाख रुपये झाले. तुम्ही त्यात किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, एसआयपीची किमान दरमहा रक्कम 500 रुपये आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत फंडाची एकूण मालमत्ता (Asset) 9,714 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) 0.84%होते.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund) :

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडानेही 5 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. 1 लाखांचे मूल्य सुमारे 2.89 लाख रुपये झाले. 5 वर्षांचा परतावा 23.5% सीएजीआर आहे. त्याचबरोबर 5000 रुपये मासिक एसआयपीचे (SIP) मूल्य 6.24 लाख रुपये आहे. तुम्ही त्यात किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, एसआयपीची किमान मासिक रक्कम 100 रुपये आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या निधीची एकूण मालमत्ता (Asset) 16,633 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) 1.06%होते.

अॅक्सिस स्मॉल कॅप फंड (Axis Small Cap Fund) :

अॅक्सिस स्मॉल कॅप फंडाने 5 वर्षांत 23 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. ज्यांनी 1 लाखांची गुंतवणूक या फंडमध्ये केली त्यांचे 5 वर्षांत 2.85 लाख रुपये झाले. तर 5 हजार मासिक एसआयपीचे मूल्य सुमारे 6.35 लाख रुपये झाले. तुम्ही 5000 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, एसआयपीची किमान दरमहा रक्कम 500 रुपये आहे. 31 ऑगस्ट 2021 रोजी या निधीची एकूण मालमत्ता (Asset) 7095 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) 0.39% होते.

कोटक स्मॉल कॅप फंड (Kotak Small Cap Fund) :

कोटक स्मॉल कॅप फंडाने 5 वर्षात 22.5 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. 1 लाखांची गुंतवणूक 5 वर्षात 2.75 लाख झाली. तर 5 हजार मासिक एसआयपीचे मूल्य सुमारे 6.5 लाख रुपये झाले. तुम्ही 5000 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, एसआयपीची किमान मासिक रक्कम 1000 रुपये आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या निधीची एकूण मालमत्ता (Asset) 5642 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) 0.42% होते.

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (HDFC Small Cap Fund)

एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाने 5 वर्षात 21% सीएजीआर परतावा दिला आहे. यात 1 लाखांची गुंतवणूक 2.56 लाख झाली. तर 5 हजार मासिक एसआयपीचे मूल्य सुमारे 5.5 लाख रुपये झाले. तुम्ही 5000 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी,एसआयपीची किमान दरमहा रक्कम 500 रुपये आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या निधीची एकूण मालमत्ता (Asset) 12,913 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण (Expense Ratio) 0.83%होते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची अधिकृत विक्री सुरू; मुंबईतील Apple Store बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

SCROLL FOR NEXT