Savings scheme  esakal
अर्थविश्व

Saving Scheme : सरकारकडून सर्वसामान्यांना नववर्षाची भेट!

सरकारने किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ केली आहे.

शिल्पा गुजर

Small Savings Scheme : सरकारने सर्वसामान्यांना नववर्षाची भेट दिली आहे. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने जानेवारी-मार्च तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांवर (small savings schemes) व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.

ही सलग दुसरी तिमाही आहे जेव्हा सरकारने छोट्या बचत योजनांवरील (small savings schemes) व्याजदरात वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाने हा व्याजदर 0.20% वरून 1.10% करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, या लहान बचत योजनांवरील व्याज दर आता 4% ते 7.6% पर्यंत आहे.

सरकार दर तिमाहीत लहान बचत योजनांच्या व्याजदराचा आढावा घेते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर डिसेंबर तिमाहीत 7.6% व्याज मिळत होते.

आता ते 8% पर्यंत वाढले आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (National Savings Certificate) 6.8% व्याज दर मिळत होता, जो वाढून 7% झाला आहे. सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident fund) योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल नाही. डिसेंबरच्या तिमाहीप्रमाणे, मार्च तिमाहीतही तो 7.1% च्या पातळीवर राहिला आहे.

सरकारने किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ केली आहे. 123 महिन्यांसाठी किसान विकास पत्राला डिसेंबर तिमाहीत 7% व्याज दर मिळत होता, जो आता 120 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.2% व्याजदर मिळेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT