स्मार्ट खबरदारी : चेक देताय? काळजी घ्या! sakal
अर्थविश्व

स्मार्ट खबरदारी : चेक देताय? काळजी घ्या!

चेकमधील नावात अथवा रकमेत फेरफार करून गैरप्रकार (फ्रॉड) करण्याच्या घटना वरचेवर घडताना दिसून येतात.

सुधाकर कुलकर्णी

चेकमधील नावात अथवा रकमेत फेरफार करून गैरप्रकार (फ्रॉड) करण्याच्या घटना वरचेवर घडताना दिसून येतात. यावर एक प्रभावी उपाय म्हणून ‘पॉझिटीव्ह पे’ ही सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केली असून, नुकतीच म्हणजे एक सप्टेंबर २०२१ पासून रिझर्व्ह बँकने ती लागू केली आहे.

‘पॉझिटीव्ह पे’ सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये...

  • रु. ५०,००० वरील रकमेचा चेक देण्यासाठी ही सुविधा खातेदारांना आता वापरता येईल. रु. ५०,००० ते रु. ५ लाखांपर्यंतच्या रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे ऐच्छिक स्वरुपाची असेल; मात्र रु. ५ लाख व त्यावरील रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे बंधनकारक असणार आहे.

  • यानुसार चेक देताना चेकवरील पेयीचे नाव, रक्कम, तारीख व चेक नंबर हा तपशील चेक देण्यापूर्वी बँकेला कळवावा लागणार आहे.

  • आपण दिलेल्या तपशिलाची नोंद बँकेकडे घेतली जाईल व ज्यावेळी चेक बँकेकडे ‘पेमेंट’साठी येईल, त्यावेळी आपण दिलेला तपशील व चेकवरील तपशील तंतोतंत जुळला तरच बँकेकडून चेकचे पेमेंट केले जाईल; अन्यथा चेक परत केला जाईल. तसे झाल्यास चेक रिटर्न चार्जेस खातेदाराच्या खात्यावर नावे टाकण्यात येतील.

  • जर रु. ५ लाख अथवा त्यावरील रकमेचा चेक देताना अशी माहिती खातेदाराने बँकेस दिली नसेल, तर चेकचे पेमेंट होणार नाही (खात्यात पुरेशी शिल्लक असली तरी); शिवाय चेक रिटर्न चार्जेसही भरावे लागतील.

  • चेकचा तपशील देण्यासाठी आपण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांचा वापर करू शकता. बँकांनी आता हा पर्याय त्याच्या साईटवर; तसेच मोबाईल अॅपवर देऊ केलेला आहे.

  • आपण जर नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारखी सुविधा वापरत नसाल, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन हा तपशील देणे गरजेचे आहे.

  • ‘पॉझिटीव्ह पे’ची पूर्तता केली नसल्यास चेक पेमेंट बाबतची तक्रार करता येणार नाही. त्यामुळे आधीच खबरदारी घ्यायला हवी.

थोडक्यात, यापुढे चेकचे पेमेंट आणखी सुरक्षित झाले आहे, असे म्हणता येईल.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिल प्लॅनर- सीएफपी आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'हैद्राबाद गॅझेटचा शब्दनशब्द मी..', सरकारच्या निर्णयावरही केली टीका

Ujani Dam Update : उजनीतून भीमा नदी पात्रात १ लाखाहून अधिक क्युसेक्सने विसर्ग; भीमा नदीला पूर स्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ladki Bahin Yojana: तब्बल ४ लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारला लावला चुना, पडताळणीत धक्कादायक बाब उघड; नेमकं काय घडलं ?

Latest Marathi News Updates : सोलापूरमध्ये पावसाची मुसळधार! पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

SCROLL FOR NEXT