Smart Information Mobile sakal
अर्थविश्व

स्मार्ट माहिती - मोबाईल सिमकार्ड आणि‘अकाउंट झीरो’

मोबाईलमधील ड्युएल सिमकार्ड रिन्यू न केल्याने बँकेतून ७५ लाख रुपये चोरट्यांनी चोरले.

सकाळ वृत्तसेवा

शिरीष देशपांडे

दिल्लीमधील एका उद्योजकाचे मोबाईलमधील ड्युएल सिमकार्ड रिन्यू न केल्याने बँकेतून ७५ लाख रुपये चोरट्यांनी चोरले. हे ड्युएल सिमकार्ड बँकेत त्यांच्या खात्याला जोडलेले होते.

हे कसे घडले?

या उद्योजकांच्या मोबाईल फोनमधील दुसरे सिमकार्ड बँक खात्याला जोडलेले होते. ते बरेच दिवस रिन्यू न केल्याने मोबाईल कंपनीने ते दुसऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ठेवले होते. चोरटे लोक मोबाईल कंपनीच्या वितरकांकडून रिन्यू न झालेल्या कार्डच्या शोधातच असतात आणि असे उपलब्ध असलेले सिमकार्ड एका चोरट्याने घेतले.

त्या नंबरला संलग्न असलेल्या यूपीआयवर जाऊन फर्गेट युजर आयडी यंत्रणा वापरून आयडी मिळवला. त्याआधारे कोणते बँक खाते जोडले आहे, त्याचा तपशील मिळवला आणि बँकेच्या पोर्टलवर जाऊन त्याच्याकडे असलेले सिमकार्ड आणि खातेधारकाची अन्य मार्गाने चोरलेली माहिती याचा वापर करून त्याने फर्गेट पासवर्डद्वारे नवा पासवर्ड मिळवला आणि बँकेतून ७५ लाख रुपये चोरले.

तुमच्या मनात प्रश्न येईल, की त्याने वॅलेटमधूनच का नाही पैसे चोरले? कारण असे, की वॅलेटमधून एका दिवशी एक लाख रुपयेच काढता येतात.

या घटनेवरून धडा घेत आपण बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे, ते पाहू.

आपल्या खात्याला जोडलेले सिमकार्ड व्हॅलिड (चालू) आहे ना, ते तपासा.

प्रीपेड कार्डनंबर या खात्याला जोडू नये; जोडलाच, तर वेळीच रिन्यू करावा.

फोन हरवला, तर तातडीने सिमकार्ड मोबाईल कंपनीला संपर्क करून रद्द करावे. जुना नंबर तात्पुरता रद्द करावा.

नवा फोन किंवा नंबर घेतला, तर जुना नंबर बँकेत जाऊन रद्द करावा, तो खरोखर बँकेने काढून टाकला आहे ना, याची खातरजमा करावी.

सिमकार्ड खराब झाले, तर तातडीने

बदलून घ्यावे.

आपल्या खात्यात कमीतकमी पैसे

ठेवावेत.

आपल्या बँक खात्यावर मधूनमधून लक्ष ठेवावे.

फसवणूक झाली, तर काय कराल?

ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

१९३० अथवा १५५२६० (महाराष्ट्रासाठी) या क्रमांकावर संपर्क साधा.

बँकेत समक्ष जाऊनही तक्रार नोंदवा आणि नुसती तक्रार नोंदवून थांबू नका, तर सतत पाठपुरावा करा.

फोनवर किंवा संगणकावर असलेले या संदर्भातील काही पुरावे, संदर्भ असतील तर जपून ठेवा. ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. पुढे जाऊन आपल्याला हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील.

शक्य आणि आवश्यक असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(लेखक सीए आणि सायबर गुन्हेविषयक तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT