Unemployment 
अर्थविश्व

बाप रे! देशातील तब्बल एवढ्या जणांनी गमावला रोजगार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा फटका बसत एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात बेरोजगारी दर वाढून २६.२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. 

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेला रोजगार दर एप्रिल महिन्यात घसरून २६ टक्‍क्‍यांवर आला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये यात १४ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. याचाच अर्थ देशातील १४ टक्के कर्मचारी किंवा कामगारांनी रोजगार गमावला आहे. बेरोजगारांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. 

देशातील १४ कोटी नागरिकांनी लॉकडाउनच्या कालावधीत रोजगार गमावल्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे रोजगार दरही घसरला आहे. गेल्या आठवड्यात २७ टक्‍क्‍यांवर असलेला रोजगारदर २६.२ टक्‍क्‍यांवर आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. ग्रामीण भारतातील बेरोजगारी दर २६.७ टक्के आहे तर, शहरी भागातील बेरोजगारी दर २५.१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT