vijay mallya 
अर्थविश्व

माल्ल्याची 5600 कोटींची मालमत्ता बँका जप्त करू शकणार

सूरज यादव

नवी दिल्ली - कर्जबुडव्या विजय मल्ल्याची मालमत्ता आता बँकांना जप्त करता येणार आहे. याबाबत प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट कोर्टाने बँकेच्या फसवणूक प्रकरणी विजय माल्ल्याच्या 5 हजार 600 कोटींच्या मालमत्ता बँकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालायने 24 मे पोदी 4 हजार 233 कोटी रुपये आणि 1 जूनला 1 हजार 411 कोटींची मालमत्ता बँकेच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला होता. एसबीआयच्या नेतृत्वाखाली माल्ल्याच्या मालमत्तेबाबतची कारवाई होणार आहे.

एसबीआयच्या नेतृत्वाखाली 17 बँकांकडून विजय माल्ल्याने 9 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. आता हे कर्ज वसूल करण्यासाठी बँकांकडून त्याच्या मालमत्तेवर कारवाई केली जाईल. बँकांना या मालमत्तेचा लिलावही करता येणार आहे.

विशेष न्यायाधीश जेसी जगदाळे यांनी सांगितलं की, मालमत्तेचे दावेदार हे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि त्यांना नुकसान सहन करावं लागलं आहे. माल्ल्याने स्वत: थकीत रकम देण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. आता तो बँकाकडून होणाऱ्या वसुलीच्या परवानगीच्या याचिकेला विरोध करत आहे. दावा करणाऱ्या बँका या सार्वजनिक आहेत आणि हा जनतेच्या पैशांचा व्यवहार आहे.

माल्ल्या प्रकरणी न्यायालयाने सांगितलं बँकानी 6 हजार 203 कोटी रुपयांचा दावा हा काल्पनिक नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत नुकसानीचा अंदाज येणं कठीण आहे. वसुलीसाठी 5 हजार 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

SCROLL FOR NEXT