Share Market Sakal
अर्थविश्व

'हा' मल्टीबॅगर केमिकल स्टॉक मार्चपासून निफ्टी 50 इंडेक्समध्ये

सकाळ डिजिटल टीम

मल्टीबॅगर स्टॉक एसआरएफ (SRF) शुक्रवारी सकाळी 6 टक्क्यांहून अधिक वाढला. एसआरएफचा (SRF) स्टॉक 31 मार्च 2022 पासून निफ्टी 50 इंडेक्समध्ये समाविष्ट केला जाईल अशी माहिती एनएसईने (NSE) दिली. यामुळे या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. हा स्टॉक निफ्टी 50 आणि निफ्टी 100 या दोन्ही निर्देशांकांमध्ये समाविष्ट केला जाईल.

शुक्रवारी हा शेअर 84 रूपयांच्या अपसाईड गॅपने उघडला आणि 2413.85 रूपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, जो एनएसईवर (NSE) गुरुवारच्या 2271.40 रूपयांपेक्षा 6 टक्क्यांनी जास्त आहे. शेअर बाजार तज्ज्ञांचे मत आहे की या स्टॉकमध्ये तांत्रिक ब्रेकआउट 2450 रूपयांच्या वर दिसू शकतो आणि शॉर्ट टर्ममध्ये हा शेअर 2600 रूपयांपर्यंत जाऊ शकतो.


निफ्टी 50 आणि निफ्टी 100 मध्ये एसआरएफ (SRF) शेअर्सचा समावेश केल्याने यात तेजी दिसून येत असल्याचे जीसीएल सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणाले. याशिवाय, तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचे निकाल चांगले राहिले आहेत. यंदाच्या चौथ्या तिमाहीचे निकालही चांगले लागतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच येत्या ट्रेडिंग सत्रात या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा मल्टीबॅगर स्टॉक पोर्टफोलिओमध्ये जोडला जाऊ शकतो.

हा स्टॉक शॉर्ट टर्म किंवा एका महिन्याच्या कालावधीसाठी 2600 रूपयांपर्यंत जाऊ शकतो असे चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया सांगतायत. सध्या या शेअरमध्ये खरेदी करत 2250 रूपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.

गेल्या 1 महिन्यात या स्टॉकमध्ये 2.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 6 महिन्यांत हा स्टॉक 35 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, गेल्या 1 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 5 वर्षांत या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकमध्ये 665 टक्के वाढ झाली आहे.


नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

IPL 2026 Qualifier 1 : गुजरात टायटन्सची पराभवामुळ डोकेदुखी वाढली! शुभमन गिल अन् संघाची झोप उडवणारी बातमी...

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तामिळनाडू सरकारने जाहीर केली पीक कर्जमाफी; 14 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा, 'थलपती'नं दिलेलं आश्वासन पाळलं

Bike Mileage Increasing Tips : टू व्हीलर गाडीचं मायलेज कमी आहे? मग आजच करा 'हे' 5 बदल, मायलेज होईल डबल

Latest Marathi News Live Update : ईदनिमित्त बळी देण्याची परवानगी रद्द, वरिष्ठ पोलिसांची माहिती

SCROLL FOR NEXT