Market Sakal
अर्थविश्व

स्मार्ट सल्ला : बाजारात हवे वास्तवाचे भान

मागील जवळपास वर्षभर शेअर बाजाराने जोरदार परतावा देऊन अनेकांना मालामाल केले. या काळात लाखो नवे गुंतवणूकदार बाजारात आले आहेत.

श्रीनिवास जाखोटिया, रितेश मुथियान

मागील जवळपास वर्षभर शेअर बाजाराने जोरदार परतावा देऊन अनेकांना मालामाल केले. या काळात लाखो नवे गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. परंतु, जे नवे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी या आधी आलेली मोठी मंदी बघितली नसल्याने; तसेच बाजाराबद्दल अनेक रंजक दंतकथा ऐकल्याने अनेकदा ते असे मानून चालतात, की शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास मोठा नफाच होणार व यात अनेकदा चुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मोठी आर्थिक झळही बसू शकते.

त्यामुळे झटपट पैसे मिळतील, या उद्देशाने नव्हे, तर दीर्घकाळात नफा मिळेल, यासाठीच बाजारात यावे. तसेच गुंतवणूक करताना कमीत कमी ५-६ वर्षे जे पैसे लागणार नाहीत, तेच गुंतवणुकीसाठी वापरावेत. कारण बाजारात तात्पुरती पडझड जरी झाली तरी दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर पुन्हा जेव्हा बाजार उभारी घेईल, तेव्हा आपली गुंतवणूक ही पुन्हा नफ्यात येईल. असे अनेक शेअर जे कधी काळी ‘लार्ज कॅप’ होते, तेच शेअर आज ‘पेनी स्टॉक’ म्हणून ओळखले जातात. उदा. युनिटेक.

  • त्यामुळे वेळोवेळी अंशतः नफा काढून घेत राहणे हे कायमच हितकारक आहे. तसेच वायदे बाजाराचे सौदे हे नव्या गुंतवणूकदारांनी व सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी टाळावे.

  • सर्वसामान्य गुंतवणूकदाराला पूर्ण अभ्यास करणे जरी शक्य नसले तरी त्याने खालील महत्त्वाच्या मुद्दा लक्षात घ्यावा.

  • इतिहासात जेवढया कंपन्या बुडाल्या आहेत, त्या मोठ्या कर्जामुळे! त्यामुळे आपण ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करीत आहोत, ती कंपनी कर्जमुक्त आहे का, हे आपल्या गुंतवणूक सल्लागाराला नक्की विचारावे.

ट्रेडिंग, की गुंतवणूक?

अनेकांना हा प्रश्न कायमच असतो, की ‘ट्रेडिंग’ करावे की गुंतवणूक? इथे दोन अकाउंटचा पर्याय आपण वापरू शकतो. एक खाते हे फक्त दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व दुसरे ‘ट्रेडिंग’साठी. यातून दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. फक्त ‘ट्रेडिंग’ करताना उपलब्ध रकमेचा वापर करून तेवढेच ‘ट्रेडिंग’ करावे. अनेकदा ब्रोकरकडून अतिरिक्त मर्यादा असल्याने लोक उपलब्ध रकमेपेक्षा मोठे सौदे करतात व त्यात जर नुकसान झाले तर ते तुमच्या भांडवलात मोठ्या प्रमाणात घट करू शकतात.

थोडक्यात, बाजाराकडून वास्तवाचे भान ठेवून परताव्याची अपेक्षा ठेवावी. मुदत ठेवींवर सहा टक्क्यांमध्ये खूष असणारे शेअर बाजारातून मात्र वर्षभरात १०० टक्के परताव्याची अपेक्षा करतात. अर्थशास्त्राचा सर्वांत मोठा मुद्दा हा कायमच लक्षात ठेवा- जेवढी जोखीम, तेवढा परतावा. त्यामुळे जास्त परताव्यासाठी जास्त जोखीम घेणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी टाळावे. तसेच स्वतःला शेअऱ बाजारात पूर्ण वेळ देता येत नसल्यास, ‘म्युच्युअल फंडस सही है’ या जाहिरातींमधील स्लोगनप्रमाणे म्युच्युअल फंडांचा विचार करावा.

(लेखकद्वय शेअर बाजारातील गुंतवणुकीचे जाणकार अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT