Bitcoin Sakal
अर्थविश्व

भारतात BitCoin बंद होणार? 'क्रिप्टोकरन्सी'वर संसदेचा मोठा निर्णय

ओमकार वाबळे

जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत असलेली क्रिप्टोकरन्सी भारतात टिकणार का, यावर संसदेत चर्चा सुरू होती. संसदेच्या स्थायी समितीची यासंदर्भात बैठक पार पडली. क्रिप्टोकरन्सीबाबत असलेली अनिश्चितता लक्षात घेता सरकारने त्यावर बंदी घालावी अशी मागणी काही जणांनी केली होती. मात्र, सरकारने बंदी घालण्यास विरोध दर्शवला आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत सध्या सुरू असलेल्या आर्थिक बाबींवर संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत डिजिटल चलनात गुंतवणुकीवर बंदी घालता येणार नाही यावर एकमत झालं आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या सदस्यांना मीटिंगमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल चलनात गुंतवणूक करणे नियमनाच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आहेत. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर सध्या बंदी घातली जाणार नाही! ते नियमनाच्या कक्षेत आणण्यावर एकमत झाल्याची माहिती या बैठकीनंतर समोर आली आहे.

दरम्यान सिन्हा यांच्या संसदीय बैठकीने गुंतवणूकदारांच्या भांडवलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. संसदीय समितीच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी नियामक यंत्रणा तयार करण्यावर एकमत झालं. क्रिप्टोकरन्सीबाबतच्या नियामकाची भूमिका कोणाकडे सोपवायची हे उद्योग विश्वातील काही सदस्य आणि इतर भागधारकांना अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बैठकीत खासदारांनी गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षेबाबतच्या समस्या समितीसमोर मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT