Amul Franchise esakal
अर्थविश्व

Amul Franchise घ्या अन् महिन्याला लाखो कमवा!

तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर येत्या नवीन वर्षात अमुल तुम्हाला ही संधी देत आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय करु शकता. अधिक माहिती जाणुन घेऊयात.

शिल्पा गुजर

तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर येत्या नवीन वर्षात अमुल तुम्हाला ही संधी देत आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय करु शकता. अधिक माहिती जाणुन घेऊयात.

Business Opportunity : नवे वर्ष अगदी तोंडावर आहे. नवीन वर्षात स्वतःचा व्यवसाय करायचा संकल्प आखला असेल तर ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत व्यवसाय करण्याची संधी आहे. अमूल ग्राहकांना फ्रँचायझी (Amul Franchise) ऑफर करत आहे. छोट्या गुंतवणुकीत दर महिन्याला नियमित कमाई करता येते. अमूल फ्रँचायझी (Amul Franchise) घेणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. अधिक जाणून घेऊयात.

फ्रँचायझी रॉयल्टी (Franchise royalty)आणि प्रॉफिट शेअरींगशिवाय उपलब्ध

अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा नफा वाटणीशिवाय ही फ्रँचायझी (Franchise) देत आहे. इतकेच नाही तर अमूलची फ्रँचायझी (Amul Franchise) घेण्याचा खर्चही फारसा जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय Business सुरू करू शकता.

किती गुंतवणूक (Investment) करावी लागेल ?

अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत आहे. जर तुम्हाला अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्हाला त्यात सुमारे 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये 25 हजार रुपये नॉन-रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटीसाठी, 1 लाख रुपये नूतनीकरणासाठी, 75 हजार रुपये उपकरणावर खर्च केले जातात. तुम्हाला फ्रँचायझी पेजवर याबद्दल अधिक माहिती मिळेल.

जर तुम्हाला अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर चालवायचे असेल तर त्याची गुंतवणूक थोडी जास्त आहे. हे घेण्यासाठी तुम्हाला सुमारे 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये ब्रँड सिक्युरिटीसाठी 50 हजार रुपये, नूतनीकरणासाठी 4 लाख रुपये, उपकरणांसाठी दीड लाखांचा समावेश आहे.

कमाई किती होईल ?

फ्रँचायझीच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. पण हे 'जागे'वरही अवलंबून असते. अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या MRP वर कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते.

फ्रँचायझी घेण्यासाठी अटी

तुम्ही अमूल आउटलेट घेतल्यास, तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी, किमान 300 चौरस फूट जागा असणे गरजेचे आहे.

अमूलकडून सपोर्ट

तुम्हाला अमूलकडून एलईडी सायनेज दिले जातील. सर्व उपकरणे आणि ब्रँडिंगवर सबसिडी दिली जाते. याशिवाय, इनोग्रेशन सपोर्ट दिला जातो. शिवाय, अतिरिक्त खरेदीवर सूटही मिळेल. पार्लर बॉय किंवा मालकालाही प्रशिक्षण दिले जाते. तुमच्यापर्यंत उत्पादने पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलने प्रत्येक मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हेच डिलर्स तुमच्यापर्यंत प्रॉडक्स्ट पोहोचवतील.

- अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर

retail@amul.coop वर मेल करावा लागेल.

संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही अमूलच्या खालील लिंकवर क्लिक करू शकता.

http://amul.com/m/amul-scooping-parlors

नोंद - कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बातचीत करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT