sbi 
अर्थविश्व

स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

वृत्तसंस्था

मुंबई -  सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात 0.40 टक्क्याची कपात केली आहे. याचा बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार आहे. बँकेने सर्वच मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात केलीआहे. बुधवार (ता.27) नवे व्याजदर लागू झाले आहेत. 

एसबीआयने चालू महिन्यात सलग दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे बँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे एसबीआयने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दर कपात कशी?
 7 ते 45 दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात 0.40 टक्के कपात केली. तो 2.9 टक्क्यांवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता या कालावधीसाठी 3.4 टक्के व्याज मिळेल. 

 1 वर्ष ते 3 वर्ष कालावधीच्या मुदत ठेवींवर आता ठेवीदारांना 5.1 टक्के व्याज मिळेल. 

3 वर्ष ते 5 वर्ष मुदतीच्या ठेवीवर 5.3 टक्के व्याज मिळेल. 

5 वर्षांहून अधिक आणि 10 वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर 5.4 टक्के व्याज मिळणार आहे. 

व्याजदर कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. बँकेत ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या   व्याजावर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा मासिक खर्च भागवत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारकडून बिनशर्त माफी! अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नोटिसीला गृह सचिवांनी दिलं उत्तर

IDBI Bank Fairfax: खिशात फक्त ₹64 घेऊन कॅनडात गेले, आता IDBI Bank च्या ₹53 हजार कोटींच्या डीलमुळे चर्चेत; कोण आहेत प्रेम वत्स?

IND vs WI 4th T20: भारताच्या हातातून सामना कसा निसटला? संजू सॅमसनने सांगितला टर्निंग पॉइंट; म्हणाला, “ते दोघे खेळत होते, तोपर्यंत…”

Latest Marathi News Update : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही; परिवहन मंत्र्यांची माहिती

मी तुम्हाला पचणार नाही रे... भाजपकडून निवडणूक लढवण्याची फडणवीसांची ऑफर, नाना पाटेकरांनी स्पष्ट नकार का दिला? उत्तराने नेतेही झाले चकित

SCROLL FOR NEXT