Share Market News Updates Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : आज शेअर बाजारात घसरण मात्र बँक निफ्टी तेजीत

जागतिक बाजारातून आलेल्या संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक बाजारातून आलेल्या संकेतामुळे भारतीय शेअर बाजारातही सकाळी तेजी पाहायला मिळली. बँक निफ्टी निर्देशांकाने आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी उच्च पातळी गाठली आहे. जागतिक बाजार पेठेत तेजी आली असली, तरी त्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारांमध्ये तितकी वाढ झालेली दिसत नाही. सेन्सेक्स 152.22 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 61,337.37 च्या पातळीवर आढळून आला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांक 50.50 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 18,253.30 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, बँक निफ्टीने आज उच्चांक गाठला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात 1564 शेअर्समध्ये खरेदीचे वातावरण असून 665 शेअर्सची विक्री होत असून 165 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस संमिश्र होता. सकाळी बाजारपेठत तेजी सुरू होती. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 151 अंकांनी घसरून 61,033 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 ​​अंकांनी घसरून 18,157 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, परंतु बँकिंग क्षेत्रातील समभागांची तेजी कायम राहिली. निफ्टी बँकेत वाढ झाली, तर एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. पण इतर सर्व क्षेत्रांत घसरण झाली. ऑटो, आयटी, फार्मा, ऊर्जा, धातू, मीडिया, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स मध्ये घसरण दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT