Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; बँकांचे 'हे' शेअर्स तेजीत

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी घसरण झाल्यानंतर ख्रिसमसच्या सुट्टीच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा उसळी घेतली. सेन्सेक्स पुन्हा 60,000 आणि निफ्टी 18,000 चा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे.

गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 704 अंकांच्या तेजीसह 60,555 वर बंद झाला आणि NSE निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह18006 वर बंद झाला.

BSE India

फार्मा आणि हेल्थकेअर समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग तेजीने बंद झाले. बँकिंग शेअर्सची खरेदी हे बाजारातील तेजीचे कारण होते. बँक निफ्टी 2.31 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी मेटल्स देखील तेजीसह बंद झाले आहेत. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही चांगली वाढ झाली आहे. 50 निफ्टी समभागांपैकी केवळ 11 समभाग घसरले तर 39 वर तेजीसह बंद झाले तर सेन्सेक्स 30 पैकी 25 वर बंद झाले आणि 5 घसरणीसह बंद झाले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

या शेअर्समध्ये तेजी :

इंडसइंड बँक 3.99%, ACI 3.97%, टाटा स्टील 2.74%, बजाज फिनसर्व्ह 2.53%, ITC 2.51%, अॅक्सिस बँक 2.44%, अल्ट्राटेक सिमेंट 1.98%, HDFC बँक 1.91%, Tata Steel 2.74%. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली. निफ्टी बँक 2.5 टक्क्यांहून अधिक वाढला आहे तर रिअॅल्टी, ऊर्जा, धातू क्षेत्र 2 टक्क्यांच्या वर बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ :

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांचे गेल्या आठवड्यात झालेले मोठे नुकसान भरून काढण्यास मदत झाली आहे. बाजारातील या तेजीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.87 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांची संपत्ती 277.99 लाख कोटी रुपये झाली आहे, जी पूर्वी 272.12 लाख कोटी रुपये होती.

येणाऱ्या दिवसांमध्ये अदानी पोर्ट्स (ADANIPORTS), अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT), हिन्दाल्को (HINDALCO), टाटा स्टील (TATASTEEL), टाटा मोटर्स (TATAMOTORS), आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB) या शेअर्समध्ये तेजी असू शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT