share market Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 60,906 अंकावर बंद

भारतीय शेअर बाजारात चार दिवसांच्या तेजीनंतर आज पाचव्या दिवशी लाल चिन्हावर बाजार बंद झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज सकाळी भारतीय बाजारांची सुरुवात निराशजनक झाली होती. पण दुपारपर्यंत जवळपास अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढ झाली होती. भारतीय शेअर बाजारात चार दिवसांच्या तेजीनंतर आज पाचव्या दिवशी लाल चिन्हावर बाजार बंद झाला आहे. BSE सेन्सेक्स 215 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी 62 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स आज 215.26 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 60,906.09 वर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.55 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 18,082.85 च्या पातळीवर बंद झाला.

यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजार घसरला. चलनवाढ नियंत्रित करण्याच्या उद्देशाने यूएस फेड आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयनंतर भारतीत शेअर बाजार घसरला असल्याचे तज्ञांचे मत आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. म्हणजे 21 शेअर्स घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढले तर 35 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT