stock market sakal
अर्थविश्व

Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदार हवालदिल

सकाळ डिजिटल टीम

Stock Market Closing Update : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चांगल्या प्रकारची वाढ दिसून आली होती. मात्र, या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली आहे. आज सेन्सेक्स 497.73 अंकांनी म्हणजेच 0.89 टक्क्यांनी घसरून 55,268.49 वर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांकामध्ये 147.15 अंकांची घसरण नोंदवण्यात आली असून, निफ्टी 16,483.85 वर बंद झाली आहे.

आज शेअर मार्केटमध्ये टॉप-30 समभागांपैकी 10 शेअर्स चांगल्या अंकावर बंद झाले तर, याशिवाय 20 शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. आज बजाज फिनसर्व्हचे शेअर्समध्ये जवळपास 6 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, आयटीसी, एमअँडएम, एशियन पेंट्स आणि रिलायन्सचे शेअर्सही चांगल्या वाढीसह बंद झाले.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वधारले
आज इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 3.40 टक्क्यांची घसरण नोंदव्यात आली आणि ते 1451 अंकावर बंद झाले. याशिवाय अॅक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, कोटक बँक, एलटी, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, टायटन, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, सन फार्मा, एनटीपीसी, इंडसइंड बँक यासह 20 कंपन्यांचे स्टॉकदेखील चांगल्या अंकावर बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Low Pressure : अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार?

Female Doctor Case : महिला डॉक्टरचे प्रकरण दुर्देवी, न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार शेतीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT