Share Market Sakal
अर्थविश्व

RBI च्या पतधोरणाचा नकारात्मक परिणाम; शेअर बाजारात घसरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा परिणाम शेअर मार्केटवर झालेला पहायला मिळाला. एप्रिलमध्येही पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. तेव्हा रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के असाच ठेवला होता. आजही कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( Stock Market Highlights Indian equity indices Sensex and Nifty ended lower Friday after the RBI kept the key policy rates unchanged)

या निर्णयानंतर आज शुक्रवारी शेअर मार्केटवर नकारात्मक परिणाम पहायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 132.38 अंकांच्या (0.25 टक्के) घसरणीसह 52,100.05 टप्प्यावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 20.10 अंक म्हणजेच 0.13 टक्के घसरणीसह 15,670.25 च्या टप्प्यावर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 882.40 अंक म्हणजेच 1.74 टक्क्यांनी मजबूत झाला होता.

रिझर्व्ह बँकेनी केल्या महत्त्वपूर्ण घोषणा

शक्तिकांत दास यांनी आज सांगितलं की, आर्थिक सुधारणांसाठी दरांमध्ये कोणता बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेनं एप्रिल महिन्यात झालेल्या पतधोरण बैठकीतही प्रमुख व्याज दरांमध्ये बदल केला नव्हता. अर्थव्यवस्थेसाठी काही गोष्टी आशेचा किरण असल्याचे सांगितले. तसंच मान्सूनचा अंदाज, कृषी क्षेत्राची क्षमता आणि जागतिक पातळीवर पुन्हा पुर्ववत होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्यानं देशांतर्गत अर्थव्यवस्थेत तेजी येऊ शकते असा अंदाजही शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.

जीडीपी वाढीच्या अंदाजाबद्दल गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, आर्थिक वर्ष 2021-22 साठी 9.5 टक्के इतका अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेनं चालु आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज 10.5 टक्क्यांवरून 9.5 टक्के इतका कमी केला आहे. 2021-22 साठी CPI इन्फ्लेशनचा अंदाज 5.1 टक्के इतका आहे.

मोठ्या शेअर्सची परिस्थिती

ओएनजीसी, बजाज फिनसर्व, ग्रासिम, कोल इंडिया आणि टाटा मोटर्स आज हिरव्या निशाण्यावर बंद झाले. तर नेस्ले इंडिया, एसबीआय, एचडीएफसी बँक, हिंडाल्को आणि ऍक्सिस बँक यांचे शेअर्स लाल निशाण्यावर बंद झाले.

गुरुवारी 52 हजारांचा टप्पा पार

काल गुरुवारी गुरुवारी शेअर बाजारामध्ये ऐतिहासिक उसळी दिसून आली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 272 अंकांच्या (0.52 टक्के) तेजीने 52,121 वर पोहोचला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 15,672.25 वर ओपन झाला होता. आज 1528 शेअर्समध्ये तेजी आली होती तर 278 शेअर्समध्ये घट झाली होती. 51 शेअर्समध्ये कसलाही बदल झालेला नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT