share market  sakal
अर्थविश्व

Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; टाटांच्या या शेअर्समध्ये तेजी

आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीय बाजारांसाठी चांगली झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : आज आशियाई बाजारातूनही चांगले संकेत मिळत आहेत आणि या आधारावर असे म्हणता येईल की, आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीय बाजारांसाठी चांगली झाली आहे.

आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 246.70 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 60.147 वर उघडला.

BSE India

दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी आज 93.10 अंकांच्या किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 17,952.55 वर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

बाजारातील मजबूत तेजीमुळे निफ्टीच्या 50 पैकी 46 समभाग कडाडून व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभागांमध्ये खरेदी सुरू आहे. त्याच वेळी, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 समभाग तेजीत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपयाही आज मजबूत दिसत आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 42 पैशांनी वधारला असून 82.72 च्या तुलनेत 82.30 वर उघडला आहे.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

भारतीय बाजाराला आज जागतिक बाजारातून पाठिंबा मिळाला. अमेरिका, युरोपसह आशियाई बाजार तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा मूडही बदलला असून, तेजी परत आली आहे.

'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्सवर टाटा मोटर्सच्या समभागांनी सर्वाधिक 1.70 टक्क्यांची तेजी घेतली. त्याचप्रमाणे टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या 1.56 टक्क्यांनी एक टक्क्याहून अधिक उसळी घेतली.

'या' शेअर्समध्ये घसरण :

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात टायटनच्या समभागात 2.09 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स 0.09 टक्क्यांनी घसरले.

आठ कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार :

आठ कंपन्या डिसेंबर तिमाहीच्या कमाईचे आकडे आज जाहीर करतील. टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा निकालही आज लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT