stock market
stock market 
अर्थविश्व

Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून सातत्यानं शेअर बाजारात चढाव-उतार पहायला मिळत आहे. दरम्यान, आज बाजाराची सुरुवात चांगल्या गतीने झाली आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हात उघडण्यात यशस्वी झाला आहे. BSE सेन्सेक्स 252.85 अंकांच्या म्हणजेच 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823.10 वर उघडला असून NSE चा निफ्टी 84.95 अंकांच्या किंवा 0.50 टक्क्यांच्या उसळीसह 17, 243.20 वर उघडला आहे.

आजच्या बाजारात NSE चा निफ्टी तुलनेत चांगली वाढ दाखवत असल्याचे चित्र आहे. त्याच्या 50 समभागांपैकी 33 वाढ नोंदवत असून उर्वरित 17 समभाग घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करताना दिसत आहेत. बँक निफ्टी 26.6 अंकांच्या म्हणजेच 37,518 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पीएसयू बँक, रियल्टी, एफएमसीजी आणि आयटीसी क्षेत्रांव्यतिरिक्त, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. मीडिया शेअर्समध्ये 1.33 टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे. मेटल आणि फार्मा समभागात 0.67-0.67 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि बजाज फायनान्स हे सेन्सेक्स यांच्या शेअर्समध्ये मोठ्या तेजीसह व्यवहार होत आहेत.

दरम्यान, सन फार्मा 2.17 टक्क्यांनी घसरला असून ब्रिटानिया 0.90 टक्के आणि इंडसइंड बँक 0.62 टक्क्यांनी घसरला आहे. एचडीएफसी लाइफ ०.५६ टक्क्यांनी आणि टीसीएस ०.४७ टक्क्यांनी घसरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात 42.63 टक्के मतदानाची नोंद

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT