Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

तज्ज्ञांचा आवडता स्टॉक देईल मजबूत परतावा...

विशेष म्हणजे मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत.

शिल्पा गुजर

शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदार कायम बाजारातील दिग्गजांच्या पोर्टफोलिओकडे लक्ष ठेऊन असतात. या बिग बुल्समध्ये राकेश झुनझुनवाला, आशिष कचोलियांसह डॉली खन्ना यांचा समावेश आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ब्रोकरेज रिपोर्टने शू मेकरची मेट्रो ब्रँड्सची (Metro Brands) निवड केली आहे आणि विशेष म्हणजे मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत.

मेट्रो ब्रँड्समध्येच का ?

ब्रोकरेज कंपनी ICICI सिक्युरिटीजने या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या फुटवेअर स्पेशॅलिटी किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे. ब्रोकरेजने या शेअरवर 588 रुपयांचे टारगेट दिले आहे. शुक्रवारी मेट्रो ब्रँड्सच्या शेअरची किंमत BSE वर 578 रुपये होती. पण ब्रोकरेजने आत 700 रुपयांच्या टारगेटसह यात खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूकदारांना येत्या काही दिवसांत 21 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो असा ब्रोकरेजला विश्वास आहे. मेट्रो ब्रँड्स (Metro Brands) कंपनीची 624 स्टोअर्स आहेत आणि पुढील 3 वर्षांत ही कंपनी आणखी 260 स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे.

राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक

मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही या शेअरमध्ये पैसे गुंतवलेत. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 26,102,394 शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 1510.2 कोटी रुपये आहे. मार्च 2022 च्या तिमाहीबद्दल बोलायचे झाले तर राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत 9.6 टक्के हिस्सेदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT