share market. Sakal
अर्थविश्व

Share Market : गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिटचे गिफ्ट; केवळ 4 वर्षांत मिळणार 'एवढे' टक्के रिटर्न

सन्मीत इन्फ्राचे शेअर्स त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी मल्टीबॅगर ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सन्मीत इन्फ्राचे (Sanmit Infra shares) शेअर्स त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. गेल्या एका वर्षात त्यांनी 213 टक्क्यांच्या वाढीसह मजबूत परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांचा विचार केल्यास या शेअरने 5,350 टक्के परतावा दिला आहे. अलीकडेच, सन्मित इन्फ्राने आपल्या शेअरहोल्डर्सना स्टॉक स्प्लिट ऑफर केले आहे. या अंतर्गत, 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरच्या बदल्यात, गुंतवणूकदारांना 1 रुपया फेस व्हॅल्यूचे 10 शेअर्स देण्यात आले आहेत. 17 नोव्हेंबर 2022 रोजी 85.70 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला अर्थात ऑल टाईम हायला स्पर्श केल्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफीट बुकींग दिसून आली. मंगळवारी हा शेअर 71.40 रुपयांवर ट्रेड करत होता.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

सन्मित इन्फ्राचा शेअर जवळपास 4 वर्षांपूर्वी 21 डिसेंबर 2018 रोजी केवळ 1.31 रुपयांना मिळत होते. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या पेट्रोकेमिकल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज इतक्या कमी काळात हे शेअर्स 65 लाखांवर गेले असते. या स्टॉकमध्ये अजूनही वाढ सुरू आहे. गेल्या एका महिन्यात याने 35 टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 40.90 रुपयांवरून 73.70 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे सहा महिन्यांत स्टॉकने 80% परतावा दिला आहे. 2022 मध्ये या शेअरने आतापर्यंत 150 टक्के रिटर्न दिला आहे.

सन्मित इन्फ्रा हा स्टॉक 31 ऑक्टोबर 2022 रोजी एक्स स्प्लिट (Stock Split) झाला. स्टॉक एक्सचेंजच्या फाइलिंगनुसार, कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मिटींगमध्ये एका शेअरचे 10 शेअर्समध्ये विभाजन अर्थात स्प्लिट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT