Amitabh-Kant
Amitabh-Kant 
अर्थविश्व

देशातील अर्थव्यवस्था मजबूत - अमिताभ कांत

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलत असल्याची ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी (ता.17) दिली. मुंबईत मॉर्निंगस्टार गुंतवणूक परिषदेत ते बोलते होते. दोन दिवस चालणाऱ्या या गुंतवणूक परिषदेला देशभरातील वित्तीय सेवा क्षेत्रातील सल्लागार, गुंतवणूक तज्ज्ञांनी उपस्थिती लावली आहे.

जागतिक पातळीवरील अडथळ्यांनंतरही भारतीय अर्थव्यवस्था लवकरच उच्च विकासदराच्या मार्गावर येईल, असे कांत यांनी सांगितले. सरकारचे अर्थव्यवस्थेवर बारकाईने लक्ष आहे. हे सरकार सुधारणांसाठी कटिबद्ध असून देशात खासगी क्षेत्र सक्रीय आहे. पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी 100 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सरकारचा उद्देश असल्याचे कांत यांनी सांगितले. महामार्ग आणि पायाभूत सेवा सुविधांसाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. अनेक क्षेत्र परकी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेसाठी हे पोषक असल्याचे कांत यांनी सांगितले. तत्पूर्वी पहिल्या सत्रात आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रवीशंकर यांनी परिषदेला संबोधित केले. त्यांनी आनंदी जीवन आणि मन:शांतीविषयी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT