Swadhar Yojana  sakal
अर्थविश्व

Swadhar Yojana : स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपये; असा करा अर्ज

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात.

सकाळ डिजिटल टीम

Swadhar Yojana : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधेसोबतच सरकार आर्थिक मदतही करते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

काय आहे स्वाधार योजना?

ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा स्वाधार योजनेचा उद्देश आहे. शहरात शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांना महाविद्यालय व विद्यापीठाकडून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, मात्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील ज्यांनी किमान इयत्ता 10वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.

कुटुंबाचे उत्पन्न किती असावे?

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही 10वी आणि 12वी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तर कोर्सचा कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त नसावा. विद्यार्थांना 60% टक्के गुण असणे आवश्यक आहे, तर अपंग विद्यार्थ्यासाठी ही मर्यादा 40% टक्के आहे. याशिवाय महाराष्ट्राचे रहिवासी असणे आणि विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

स्वाधार योजनेचे फायदे :

महाराष्ट्र स्वाधार योजनेंतर्गत, बोर्डिंग सुविधेसाठी 28,000 रुपये, निवास सुविधेसाठी 15,000 रुपये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 5,000 रुपये आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5,000 रुपये अतिरिक्त दिले जातात.

अर्ज कसा करायचा?

अर्जदाराने प्रथम महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल यानंतर, अर्जदाराला होम पेजवर जाऊन स्वाधार योजना फॉर्म डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाऊनलोड केल्यानंतर फॉर्म पूर्णपणे भरावा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून संबंधित समाजकल्याण कार्यालयात जमा करावा. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

'या' कागदपत्रांची आवश्यकता असेल :

जर तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT