Air India 
अर्थविश्व

भाजप खासदाराचा घरचा आहेर; 'एअर इंडिया विकणे म्हणजे देशद्रोह'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एअर इंडिया ही राष्ट्रीय संपत्ती असून कंपनीमधील सरकारची 100 टक्के मालकी विकणे म्हणजे देशद्रोह असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाऊ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सरकारने आजच (सोमवार) एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत सरकार एअर इंडियाची संपूर्ण मालकी विकणार असून 17 मार्चपर्यंत अर्ज मागवले आहेत. एअर इंडियाबरोबरच एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि  AISATS मधील 50 टक्के मालकी सरकार विकणार आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाकडून देखील टीका केली जात आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील सरकारवर टीका करत सरकार कफल्लक झाल्याने एअर इंडिया विक्रीस काढली असल्याचे म्हटले आहे. जीडीपी दर पाच टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मनेरगासारख्या योजनांना आर्थिक बाळ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याने सरकार मौल्यवान वस्तू विकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT