FirstCry shop 
अर्थविश्व

‘बच्चों का खेल’

‘FirstCry’ची स्थापना कशी झाली माहित आहे का?

सुवर्णा येनपुरे कामठे

सुवर्णा येनपुरे-कामठे

‘आयआयएम’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सुपम माहेश्‍वरी (Supam Maheshwari) यांनी इतरांप्रमाणे नोकरी न करता आपल्या ‘ब्रेनविझा टेक्नॉलॉजी’ या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. हा ‘ई-लर्निंग’ क्षेत्रातील प्रोजेक्ट २००० मध्ये त्यांनी सादर केला होता. ‘ब्रेनविझा’ला पुढच्या काही वर्षांमध्येच त्यांनी जगातील ‘ई-लर्निंग’ क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर २००७ मध्ये ही कंपनी माहेश्‍वरी यांनी अमेरिकास्थित ‘इंडिकॉम ग्लोबल सर्व्हिसेस’ या कंपनीला २.५ कोटी डॉलरला विकली. (success-story-About-FirstCry)

‘ब्रेनविझा’साठी काम करत असतानाच त्यांना मुलगी झाली. कामानिमित्त त्यांना खूप वेळा अमेरिका आणि युरोपमध्ये जावं लागत होतं. तेव्हा ते परदेशातून मुलीसाठी काही वस्तू खरेदी करून आणायचे. ज्या वस्तूंमध्ये गुणवत्ता तर होतीच, पण त्याचबरोबर योग्य दरात त्या वस्तू उपलब्ध व्हायच्या. या वस्तू चांगल्या असल्यातरी स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हायच्या नाहीत. ‘ब्रेनविझा’मधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की आपण बाहेरच्या देशातून आणलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तू स्थानिक बाजारात उपलब्ध नाहीत. पण भारतीय पालकांकडून अशा उत्पादनांना मागणी आहे. या वस्तूंच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्याची गरज आहे.

त्यानंतर २.५ कोटी रुपयांचे भांडवल जमा करून माहेश्‍वरी यांनी आपला मित्र अमित्वा साहा याच्यासोबत ‘ब्रेनबीस सोल्यूशन’ नावाची कंपनी सुरू केली. त्याअंतर्गतच सप्टेंबर २०१० मध्ये ‘फर्स्ट क्राय’ची स्थापना केली. सुरुवातीला त्यांचे चार स्टोअर पुणे, दिल्ली, बंगळूर आणि कोलकाता येथे कार्यरत होते. अनेक किरकोळ विक्रेते त्यांची लहान मुलांसंबधित उत्पादने ‘फर्स्ट क्राय’वर नोंदणी करून विकू लागले. पुढच्याच वर्षी म्हणजे २०११ मध्ये ते दिवसाला ५०० ऑर्डर घरपोच करू लागले. जवळपास ६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय, जगप्रसिद्ध ब्रँड असणाऱ्या लहान मुलांच्या साहित्याची यावर विक्री होऊ लागली. २०१६ मध्ये ‘फर्स्ट क्राय’ने स्वतःचा लहान मुलांच्या कपड्याचा आणि चपलांचा ‘बेबी हग’ नावाचा ब्रँड तयार केला.

‘फर्स्ट क्राय’ सोबत सध्या दोन कोटी कुटुंबे जोडली गेली आहेत. तसेच ६००० ब्रँडची जवळपास दोन लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. संपूर्ण देशभरात ‘फर्स्ट क्राय’चे ४०० हून अधिक स्टोअर आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यवसायाचा विस्तार म्हणून २०१९ मध्ये ‘फर्स्ट क्राय’ दुबईमध्येही सादर करण्यात आले. ‘फर्स्ट क्राय’चा वार्षिक नफा जवळपास १०० कोटी रुपये आहे. कंपनीला आतापर्यंत विविध कंपन्यांकडून ६.५ कोटी डॉलर इतके फंडिंग मिळाले आहे.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' जागेवर उंच निवासी इमारती उभारणार; बीएमसीचा मोठा निर्णय

IND vs PAK U19: भारताचं पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य! ऍरॉन जॉर्जचं शतक हुकलं, आयुष म्हात्रे - कनिष्क चौहाननेही गोलंदाजांना चोपलं

Nashik Leopard : सहा तासांची थरारक मोहीम! मालेगावच्या खाकुर्डीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये ‘वाईन टुरिझम’ला नवी उभारी; पर्यटन, शेती आणि उद्योगाचा संगम

Bride Viral Video: त्याला शेवटचं भेटायचंय... लग्नाच्या २ तास आधी प्रियकराला भेटायला गेली नवरी, पण तिथं नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT