Automatic payment Sakal
अर्थविश्व

स्मार्ट माहिती : ऑटो डेबिट सुविधेत काय होणार बदल?

वीजबिल, मोबाईल बिल, फोन बिल, पाईप गॅस, ब्रॉडबॅंड, केबल नेटप्लिक्स, अमॅझॉन यासारखी दरमहा भरावी लागणारी बिले वेळेत भरली जावीत.

सुधाकर कुलकर्णी

वीजबिल, मोबाईल बिल, फोन बिल, पाईप गॅस, ब्रॉडबॅंड, केबल नेटप्लिक्स, अमॅझॉन यासारखी दरमहा भरावी लागणारी बिले वेळेत भरली जावीत किंवा भरण्याचे विसरले जाऊ नये म्हणून आजकाल बहुतेक जण ही बिले भरण्यासाठी आपल्या क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईलमधील भीम/फोन पे/गुगल पे यासारख्या युपीआय अॅप; तसेच पेटीम सारखे प्रीपेड वॉलेट वरील ‘ऑटो डेबिट’ सुविधेचा वापर करीत असल्याचे दिसून येते. मात्र, काही वेळा एखादी सेवा वापरली नसताना सुद्धा बिल दिले जाऊन ‘ऑटो डेबिट’ असल्याने पेमेंट केले जाते, तर कधी बिलाची रक्कम प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त असली तरी पेमेंट केले जात असल्याने ग्राहकास मनस्ताप होतो. यावर उपाय म्हणून २० सप्टेंबर २०२१ च्या परिपत्रकानुसार, रिझर्व्ह बँकने ‘ऑटो डेबिट’ सुविधेत काही बदल सुचविले असून, त्यांची अंमलबजावणी एक ऑक्टोबर २०२१ पासून होणार आहे.

हे बदल पुढीलप्रमाणे असणार आहेत

  • आपल्या क्रेडिट/डेबिट कार्ड, मोबाईलमधील भीम/फोन पे/गुगल पे यासारख्या युपीआय अॅप, तसेच पेटीम सारखे प्रीपेड वॉलेटवरील ‘ऑटो डेबिट’च्या दिलेल्या सूचनेनुसार, थर्ड पार्टी बिलाच्या पेमेंटची कार्यवाही करण्यापूर्वी एएफए (अॅडिशनल फॅक्टर ऑफ आॅथेंटिकेशन) करणे आवश्यक असणार आहे.

  • आपली ‘ऑटो डेबिट’बाबतची नोंदणी करायची असल्यास, किंवा असलेल्या ‘ऑटो डेबिट’ सुविधेत बदल करायचा असल्यास किंवा ही सुविधा रद्द करायची असल्यास एएफए (अॅडिशनल फॅक्टर ऑफ आॅथेंटिकेशन) करणे आवश्यक असणार आहे.

  • ग्राहकाला ‘ऑटो डेबिट’ सुविधेनुसार प्रत्यक्ष ‘डेबिट’ पडण्याआधी २४ तास तशी सूचना एसएमएस/ई-मेल द्वारे दिली जाईल व यामध्ये होणाऱ्या पेमेंटचा सर्व तपशील दिला जाईल. यासाठी आपण एसएमएस किंवा ई-मेल यापैकी आपल्याला सोयीस्कर असा पर्याय आपण निवडू शकता.

  • आपल्याला २४ तास आधी पाठविलेल्या नोटिफिकेशन मधील लिंक वर क्लिक करून आपण संबंधित पेमेंटसाठी मान्यता देऊ शकता किंवा पेमेंट रद्द करू शकता.

  • ग्राहकास बिल पेमेंटची कमाल मर्यादा ठरविता येईल आणि जर आलेले बिल या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर २४ तास आधी आलेल्या नोटिफिकेशनमधील लिंकवर क्लिक करून एएफए (अॅडिशनल फॅक्टर ऑफ आॅथेंटिकेशन) करावे लागेल; अन्यथा बिलाचे पेमेंट होणार नाही.

  • रु. ५००० वरील बिलाच्या पेमेंटसाठी प्रत्येकवेळी ‘एएफए’ व ‘ओटीपी कन्फर्मेशन’ करावे लागेल. यापेक्षा कमी रकमेच्या बिलासाठी याची गरज असणार नाही.

  • जर आपल्या बँक खात्यावर बिलाची ‘ऑटो डेबिट’ सूचना दिलेली असेल तर त्यास हे बदल लागू होणार नाहीत. तसेच म्युचुअल फंडातील ‘एसआयपी’ गुंतवणुकीसाठी किंवा कर्जाच्या मासिक हप्त्यासाठी (ईएमआय) दिलेल्या ऑटो सूचना पूर्वीप्रमाणेच चालू राहतील.

(लेखक बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT