sunil mittal sunil mittal
अर्थविश्व

टेलिकॉम उद्योग प्रचंड दबावात, सेवांचे दर वाढविणे आवश्यक- सुनील मित्तल

भारती एअरटेलचे अध्यक्ष मित्तल यांनी पुढे सांगितले की, जर सध्या टेलिकॉम क्षेत्र अडचणीत आहे, दबावही खूप आहे

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: सध्या देशभरात कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात बंद झाले आहेत तर काही तोट्यात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारती एअरटेलचे सुनील मित्तल (sunil mittal) यांना टेलिकॉम क्षेत्राबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या भारतातील टेलिकॉम उद्योगांवर प्रचंड दबाव आहे. जर भारताचे डिजीटल स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सरकारने यावर लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. तसेच दूरसंचार शुल्कात वाढ केली पाहिजे, असं वक्तव्य मित्तल यांनी केले.

भारती एअरटेलचे अध्यक्ष मित्तल यांनी पुढे सांगितले की, जर सध्या टेलिकॉम क्षेत्र अडचणीत आहे, दबावही खूप आहे. मी आशा करतो की सरकार, अधिकारी आणि दूरसंचार मंत्रालय या विषयावर लक्ष देईल आणि हे सुनिश्चित करेल की दूरसंचार क्षेत्रात किमान तीन ऑपरेटर असतील आणि त्यांच्या माध्यमातून भारताचे डिजिटल स्वप्न पूर्ण होईल.

मित्तल हे भारती ग्लोबल आणि इंग्लंड सरकारच्या नेतृत्वात उपग्रह संचार कंपनीने आयोजित केलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. तसेच भारती एअरटेलने भाग भांडवल आणि बाँडच्या माध्यमातून वेळेवर व पुरेशा प्रमाणात निधी जमा केला आहे. तसेच येणाऱ़्या काही वर्षांत बाजारपेठेत भारती एअरटेल कंपनी ठामपणे उभी असेल असा विश्वासही मित्तल यांनी व्यक्त केला

पुढे बोलताना मित्तल म्हणाले की. 5 G सेवा सुरू करण्यासाठी आणि भारताचे डिजिटल स्वप्न पूर्ण करण्यासाठी दूरसंचार उद्योगाने मजबूत राहण्याची गरज आहे. दर वाढवण्याबाबत कंपनी विचार करेल की नाही असे विचारले असता मित्तल म्हणाले की, आम्ही ते करण्यास मागेपुढे पाहणार नाही पण आम्हाला ही वाढ एकतर्फी करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026, MI vs UPW: मुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव! एमेलिया केर-अमनज्योत कौर लढल्या, पण लेनिंगची युपी वॉरियर्सच पडली भारी

आता त्याचे रस्ते बदललेत... दिलीप कुमार यांच्यावर का भडकलेले बाळासाहेब ठाकरे? सांगितलेलं ऐकलं नाही तर...

Junnar Leopard : माणिकडोह केंद्रात बिबट्यांचा हाऊसफुल्ल मुक्काम! ५० बिबटे लवकरच गुजरातच्या 'वनतारा'मध्ये होणार स्थलांतरित

Uddhav Thackeray म्हणाले Mumbai चा महापौर आपलाच, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलात हलवले | BMC Update | Sakal News

Vasai Virar Mayor : वसई-विरारमध्ये बविआची सत्ता, पण महापौर कोण? आरक्षणाच्या सोडतीकडे साऱ्यांचे डोळे!

SCROLL FOR NEXT