Supam Maheshwari
Supam Maheshwari Sakal
अर्थविश्व

सक्सेस स्टोरी : ‘इवलेसे रोप...’

सुवर्णा येनपुरे कामठे

‘आयआयएम’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सुपम माहेश्‍वरी यांनी इतरांप्रमाणे नोकरी न करता आपल्या ‘ब्रेनविझा टेक्नॉलॉजी’ या प्रोजेक्टवर काम करायला सुरवात केली. हा ‘ई-लर्निंग’ क्षेत्रातील प्रोजेक्ट २००० मध्ये त्यांनी सादर केला होता. ‘ब्रेनविझा’ला पुढच्या काही वर्षांमध्येच त्यांनी जगातील ‘ई-लर्निंग’ क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर २००७ मध्ये ही कंपनी माहेश्‍वरी यांनी अमेरिकास्थित ‘इंडिकॉम ग्लोबल सर्व्हिसेस’ या कंपनीला २.५ कोटी डॉलरला विकली.

‘ब्रेनविझा’साठी काम करत असतानाच त्यांना मुलगी झाली. कामानिमित्त त्यांना खूप वेळा अमेरिका आणि युरोपमध्ये जावे लागत होते. तेव्हा ते परदेशातून मुलीसाठी काही वस्तू खरेदी करून आणायचे. ज्या वस्तूंमध्ये गुणवत्ता तर होतीच, पण त्याचबरोबर योग्य दरात त्या वस्तू उपलब्ध व्हायच्या. या वस्तू चांगल्या असल्यातरी स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हायच्या नाहीत. ‘ब्रेनविझा’मधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की आपण बाहेरच्या देशातून आणलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तू स्थानिक बाजारात उपलब्ध नाहीत. पण भारतीय पालकांकडून अशा उत्पादनांना मागणी आहे. या वस्तूंच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्याची गरज आहे.

त्यानंतर २.५ कोटी रुपयांचे भांडवल जमा करून माहेश्‍वरी यांनी आपला मित्र अमित्वा साहा याच्यासोबत ‘ब्रेनबीस सोल्यूशन’ नावाची कंपनी सुरू केली. त्याअंतर्गतच सप्टेंबर २०१० मध्ये ‘फर्स्ट क्राय’ची स्थापना केली. सुरवातीला त्यांचे चार स्टोअर पुणे, दिल्ली, बंगळूर आणि कोलकता येथे कार्यरत होते. अनेक किरकोळ विक्रेते त्यांची लहान मुलांसंबधित उत्पादने ‘फर्स्ट क्राय’वर नोंदणी करून विकू लागले. पुढच्याच वर्षी म्हणजे २०११ मध्ये ते दिवसाला ५०० ऑर्डर घरपोच करू लागले. जवळपास ६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय, जगप्रसिद्ध ब्रँड असणाऱ्या लहान मुलांच्या साहित्याची यावर विक्री होऊ लागली. २०१६ मध्ये ‘फर्स्ट क्राय’ने स्वतःचा लहान मुलांच्या कपड्याचा आणि चपलांचा ‘बेबी हग’ नावाचा ब्रँड तयार केला.

‘फर्स्ट क्राय’ सोबत सध्या दोन कोटी कुटुंबे जोडली गेली आहेत. तसेच ६००० ब्रँडची जवळपास दोन लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. संपूर्ण देशभरात ‘फर्स्ट क्राय’चे ४०० हून अधिक स्टोअर आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यवसायाचा विस्तार म्हणून २०१९ मध्ये ‘फर्स्ट क्राय’ दुबईमध्येही सादर करण्यात आले. ‘फर्स्ट क्राय’चा वार्षिक नफा जवळपास १०० कोटी रुपये आहे. कंपनीला आतापर्यंत विविध कंपन्यांकडून ६.५ कोटी डॉलर इतके फंडिंग मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT