अर्थविश्व

जनधन खात्यात पैसे नाही? तरीही मिळणार 10 हजार रुपये

ओमकार वाबळे

सहसा, बचत बँक खात्यात खातेदाराला दर महिन्याला किमान शिल्लक ठेवावी लागते. तसं न केल्यास दंड भरावा लागतो. पगार खात्यासाठी हे बंधनकारक नाही. पण, यासोबतच अशी काही खाती आहेत, जिथे किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हे देखील अशाच खात्यांपैकी एक आहे.

याशिवाय जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत झीरो बॅलंस बचत खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात.

जाणून घ्या कसे मिळवायचे 10 हजार रुपये

जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

'हा' नियम आहे

या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किमान ६ महिने जुने असावे. नसल्यास, फक्त 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

U9 Chess World No1: अवघ्या ८ व्या वर्षी जगाला नमवलं! आंबेगावची लेक बुद्धीबळात जगात नंबर १; मोडला सर्वात लहान वयाचा 'हा' मोठा रेकॉर्ड

US Iran Tanaav: अमेरिका-इराण तणाव वाढला; होर्मुझ सामुद्रधुनीतील टोल पद्धतीवर निर्बंधांचा इशारा..

ऑनस्क्रीन एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, सीन पूर्ण होताच.... ठरलं तर मगच्या सेटवर नक्की काय घडलं? Viral Video

Latest Marathi News Live Update : खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेणार

SCROLL FOR NEXT