tata vistara  sakal
अर्थविश्व

Air India : नाही राहणार आता टाटाचा विस्तारा ब्रँड; वाचा काय आहे कारण

जानेवारी २०२२ मध्ये टाटांनी भारत सरकारकडून एअर इंडिया ताब्यात घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Tata Group : टाटा समूह आपले चार एअरलाइन्स ब्रँड एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे ते विमान वाहतूक क्षेत्रात आपले मोठे साम्राज्य प्रस्थापित करू शकेल. यासाठी टाटा विस्तारा ब्रँड देखील समाप्त करू शकते, टाटा सिंगापूर एअरलाइन्सशी याबद्दल बोलणी करत आहेत. टाटांच्या या निर्णयानंतर एअर इंडियाची देशातील विमानांची संख्या आणि बाजारपेठेतील हिस्सा या बाबतीत मोठा असेल. त्यांनतर टाटा ही दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनेल.

हेही वाचा : का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

जानेवारी २०२२ मध्ये टाटांनी भारत सरकारकडून एअर इंडिया ताब्यात घेतली. एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वी, टाटाकडे विस्तारा आणि एअरएशिया या दोन एअरलाइन्स कार्यरत होत्या. एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर टाटांना एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे ब्रँडही मिळाले. त्याच महिन्यात, टाटा म्हणाले की, ते एअरएशिया पूर्णपणे विकत घेणार आहेत आणि कमी किमतीची वाहक म्हणून एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन करणार आहे. म्हणजेच टाटा सर्व एअरलाईन्स फक्त एअर इंडिया ब्रँडच्या नावाखाली चालवेल.

टाटा विस्तारा ब्रँड संपुष्टात आणू शकते आणि विस्तारा एअरलाइन्समधील टाटाची परदेशी भागीदार सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडिया लिमिटेडमध्ये 20 ते 25 टक्के हिस्सा दिला जाऊ शकतो. तसेच विस्ताराच्या काही बोर्ड सदस्यांना एअर इंडियाच्या बोर्डात स्थान दिले जाऊ शकते. सध्या टाटा सिंगापूर एअरलाइन्समध्ये सिंगापूर एअरलाइन्सचा 49 टक्के हिस्सा आहे.

येत्या काही दिवसांत एअर इंडिया आपल्या विमानांची संख्या वाढवणार आहे. टाटा 300 विमानांची ऑर्डर देऊ शकते, जी व्यावसायिक विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर असेल. यासोबतच एअर इंडिया एक अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT