Vivek Prakash
अर्थविश्व

TATA Groupच्या 'या' स्टॉकमध्ये सलग पाचव्या सत्रात अप्पर सर्किट

शिल्पा गुजर

टाटा ग्रुपची टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडर कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेज लिमिटेड (Tata Teleservices (Maharashtra) Limited) , गेल्या काही काळापासून सतत वाढत्या ट्रेंडमध्ये आहे. मंगळवारी म्हणजेच 15 मार्चला सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात या शेअरला अप्पर सर्कीट लागले आहे. सध्या हा स्टॉक खूपच अस्थिर आहे. मात्र, परताव्याच्या बाबतीत तो मल्टीबॅगर ठरला आहे. मार्च 2021 पासून, हा स्टॉक 690 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यादरम्यान, शेअरने 291 रुपयांचा ऑल टाइम हाय टच केला. तत्पूर्वी, 14 मार्च, 11 मार्च, 10 मार्च, 9 मार्चच्या ट्रेडिंग सत्रात स्टॉकने अप्पर सर्किट मारले होते.

12 महिन्यांत जवळपास 7 पट वाढ


शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमध्येही टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्येही अस्थिरता दिसून येते आहे. बर्‍याच ट्रेडिंग सत्रांत या शेअरने एकाच दिवशी वरच्या आणि खालच्या दोन्ही सर्किट्स लागलेत. 15 मार्च 2021 ते 15 मार्च 2022 पर्यंत टाटा टेलिसर्व्हिसेसचा शेअर 6.9 पटीने वाढला आहे.

15 मार्च 2021 ला या शेअरची किंमत 15.10 रुपये होती, जी 15 मार्च 2022 ला सरळ 119 रुपयांवर गेली. म्हणजेच, या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना सुमारे 7 पट परतावा मिळाला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 मार्च 2021 च्या किंमतीवर 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते सुमारे 7 लाख रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्याची झळाळी झाली कमी, ४ दिवसात ७ हजारांनी स्वस्त; आज किती आहे दर?

Kolhapur Collector Office : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शिक्षकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, अचानक घडलेल्या प्रकारामुळे तणाव

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर

'जैन मंदिर किंवा मंत्रिपद वाचवा', मोहोळ यांना मुंबईत वरिष्ठांनी वॉर्निंग दिल्याचा धंगेकरांचा खळबळजनक दावा

HIV infected Blood : हॉस्पिटलचा हलगर्जीपणा, थॅलेसिमियाग्रस्त ५ मुलांना चढवले एचआयव्ही संक्रमित रक्त

SCROLL FOR NEXT