Tata Megapixel  
अर्थविश्व

टाटांची नवी कार; 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: टाटा मोटर्स पुन्हा एकदा प्रत्येकाच्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणणार आहे. टाटा मोटर्स लवकरच स्वप्नवत वाटणारी नवीन कार सादर करणार असून 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार आहे. टाटांनी 82 व्या जिनिव्हा मोटर शोमध्ये 'मेगापिक्सल' सादर केली होती.

चार लोकांना घेऊन जाण्याची क्षमता असलेली ही कार पर्यावरणास अनुकूल अशा पद्धतीची आहे. हायब्रिड पद्धतीची असलेली या कारची बॅटरी एकदा चार्ज केल्यास 87 किलोमीटर धावणार आहे. शिवाय याची बॅटरी घरी देखील चार्ज करता येणार आहे. नॅनो प्रमाणेच सर्वांना कमी इंधनात अधिक अंतर पार करता यावे यासाठी टाटाने 'मेगापिक्सल'च्या रूपात नवीन कार कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटाची बहुचर्चित कार या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र टाटाकडून अजुन कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र कमी इंधनात जास्त अंतर कापणारी कार भारतीयांना कमी किंमतीत लवकर उपलब्ध करून देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Toll : कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण, पण 'या' ठिकाणी टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात!

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

Pune Garbage Scam: कचरा माफियांचा पुण्यात डेरा? ७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रशासनाला घेराव

Latest Marathi News Live Update : शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Devsthan Inam Abolition: देवस्थान इनाम निर्मूलन कायदा मागे घ्या; अष्टविनायक मंदिरांचा एकमुखी इशारा, जमिनींच्या सुरक्षेसाठी संयुक्त लढ्याची घोषणा

SCROLL FOR NEXT