अर्थविश्व

टाटा मोटर्सची मोठी घोषणा 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मारुती सुझुकीनंतर आता टाटा मोटर्सनेदेखील लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात मारुती सुझुकीने २०२० पर्यंत डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या काळात बीएस-६ उत्सर्जन मानके लागू झाल्यांनतर डिझेल वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांनाच अधिक म्हणी राहण्याची शक्यता आहे. 

 टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारिख म्हणाले की,'' भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-६ उत्सर्जन मानके लागू होत होणार आहेत. वाहन कंपन्यांना डिझेल वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागणार असल्याने डिझेल वाहनांच्या किंमती  मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.  परिणामी पुढील वर्षापासून टाटा मोटर्सने लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नव्या नियमांमुळे वाहन कंपन्यांना सर्व डिझेल वाहनांचे अद्ययावतीकरण करावे लागणार आहे. शिवाय बीएस-६ उत्सर्जन मानके नियमांचे पालन करणाऱ्या डिझेल वाहनांच्या किंमती सुमारे दोन लाख रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम विक्रीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वाहन उद्योग क्षेत्रात मारुती सुझुकीन २०२० पासून डिझेल वाहनांची विक्री बंद करणार असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्सचा शेअर 2.42 टक्क्यांच्या घसरणीसह 195.25 रुपायंवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 56 हजार 274.43 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT