अर्थविश्व

सहा महिन्यानंतर पुन्हा आयटी कंपन्यामध्ये पगारवाढ, ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा 

सकाळन्यूजनेटवर्क

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (Tata Consultancy Services) आगामी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्याचा निर्णय घेणारी टीसीएस कंपनी देशातील पहिलीच आयटी कंपनी आहे.  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या या निर्णयामुळे चार लाख ७० कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑफशोर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ६-७ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. 

सहा महिन्यात दुसऱ्यांदा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनीनं आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये एक ऑक्टोबर २०२० रोजी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा  निर्णय घेतला होता.  टीसीएसच्या प्रवक्त्याने वेतनवाढीच्या निर्णयावर शिकामोर्तब केलं असून ते म्हणाले की, कंपनीच्या बेंचमार्कनुसार जगभरातील टीसीएस कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. एप्रिल २०२१ पासून नवीन पगारवाढ लागू होणार आहे.  

हेही वाचा :

 सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यात दोनदा पगारवाढ झाल्यामुले २०२१-२२ या आर्थिक वर्षांत कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या कालवधीत सरासरी १२ ते १४ टक्केंची वाढ मिळणार आहे.  गतवर्षीही कोरोना महामारीच्या काळात टीसीएस कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती.  त्यावेळीही आर्थिक मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणारी ही देशातील पहिली आयटी कंपनी होती. कोरोना महामारीमुळे अनिश्चितता पसरली असूनही, कंपनीने आपल्या कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय उद्योगाच्या निकषांनुसार घेतला होता.

टीसीएस कंपनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या कर्मचार्‍यांना नियमितपणे पगारवाढ देत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2020 च्या तिसर्‍या तिमाहीत, टीसीएसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. कंपनीच्या महसुलात झालेली वाढ ९ वर्षांतील सर्वात मोठी वाढ होती. त्यामुळे कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांनाही पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT