Tech Job Cuts esakal
अर्थविश्व

Tech Layoff : 2008 च्या मंदीच्या तुलनेत 2022 मध्ये अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या

2008 च्या मंदीतही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली नव्हती.

सकाळ डिजिटल टीम

जगातील अनेक टेक कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. IANS अहवालानुसार, जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली आहे. 2008 च्या मंदीतही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली नव्हती.

जागतिक स्तरावर या वर्षात 965 टेक कंपन्यांनी 1 लाख 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अमेरिकेमध्ये मंदीच्या भीतीने, मेटा, ट्विटर, नेटफ्लिक्स, मायक्रोसॉफ्ट, स्नॅप सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

2023 मध्ये कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये आणि त्यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागू नये यासाठी टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. IANS च्या अहवालानुसार, 2008 ते 2009 मध्ये, टेक कंपन्यांनी सुमारे 65,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते.

मेटा, अॅमेझॉन, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स आणि इतर कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या आर्थिक परिस्थितीनुसार पुढील वर्षी ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. अशा परिस्थितीत आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते.

गुगल कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत :

Amazon आणि HP Inc देखील त्यांच्या कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत 26,000 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते. मेटाने 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. Google ची मूळ कंपनी अल्फाबेट 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT