अर्थविश्व

'ही' कंपनी 48,000 कर्मचाऱ्यांना देणार प्रत्येकी 1 लाखाचा बोनस

वृत्तसंस्था

हैदराबाद: तेलंगणा राज्य सरकारची सिंगरेनी कोलायरिज कंपनी लि. (एससीसीएल) ही कंपनी दसऱ्या निमित्त कर्मचाऱ्यांना दणदणीत बोनस देणार आहे. ही कंपनी कोळसा उत्खननाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीच्या 48,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1,00,899 रुपयांचा घसघशीत बोनस दिला जाहीर करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना राज्याच्या विधानसभेत याची घोषणा केली आहे. मागील वर्षी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या बोनसपेक्षा हा बोनस 40,530 रुपयांनी जास्त आहे. 

एससीसीएल ही तेलंगणा सरकार आणि केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी असून कंपनीला 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीला 1,765 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. 2017-18 मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला 60,369 रुपये बोनस म्हणून देण्यात आले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीने विक्रमी 6.44 कोटी टन कोळशाचे उत्पादन केले आहे. 2013-14 मध्ये 418 कोटी रुपयांवर असलेला कंपनीचा नफा मागील आर्थिक वर्षात 1,765 कोटी रुपयांवर येऊन पोचला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कोरलेलं नाव पुसता येत नाही' भाजप नेते रविंद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर केलेल्या वक्तव्यावर रितेशचं सडेतोड उत्तर, म्हणाला...

Bharat Taxi : भारत टॅक्सी ॲप लाँच! एकदम कमी भाडे; पाच दिवसांत 4 लाख लोकांनी केली नोंदणी, पाहा तुमच्या फायद्याची बातमी..

Angaraki Chaturthi 2026: दुर्मीळ योगांचा महासंयोग! पाहा, आज कोणत्या ३ राशींवर राहणार बाप्पाची कृपा?

Kolhapur Shocking Incident : घरातून न सांगता निघालेल्या वृद्धाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी गावचाच विहिरीत आढळला, नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांना रितेश देशमुखचं उत्तर

SCROLL FOR NEXT