अर्थविश्व

१५ दिवसानंतर टर्म इन्शुरन्स महागणार, जाणून घ्या किती वाढणार प्रीमियम

सकाळन्यूजनेटवर्क

पेट्रोल-डिझेल आणि गॅल यांच्या महागाईमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता धुसूर दिसत आहे. त्यातच एसी, टीव्ही आणि फ्रीज यांच्या किंमतीमध्येही वाढ होणार असल्याची चर्चा सुरु आहे. आगीत तेल म्हणतात तसेच, महागाईत भर म्हणून एप्रिल महिन्यापासून विमा महागणार आहे. नव्यान टर्म विमा खरेदी करण्याचा विचार करणार्यांना पुढील महिन्यापासून अतिरिक्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. 

देशातील विविध विमा कंपन्यांनी एप्रिल २०२१ पासून टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे.  प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एक एप्रिल २०२१ पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये  (२०२१-२२) टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये १० ते १५ टक्केंनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे विमा कंपन्यांनी टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ केल्याची चर्चा आहे.

 किती महागणार टर्म इन्शुरन्स?
कोरोना महामारीने वर्षभरापासून थैमान घातल्यामुळे विमा कंपनीना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे आता टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्येही वाढ होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून १० ते १५ टक्क्यांनी टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होणार आहे. महत्वाचं म्हणजे, या दरवाढीचा फटका नव्याने विमा घेणाऱ्यांना बसणार आहे, सध्याच्या ग्राहकांना जुन्याच दराप्रमाणे प्रीमियम भरावे लागणार आहेत. त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेण्याच्या विचारात असाल तर ३१ मार्चपूर्वीच घ्या....

का महागणार टर्म इन्शुरन्स?
टाटा एआयए, अॅगॉन लाईफ, मॅक्स लाइफ, पीएनबी मेटलाइफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि इंडिया फर्स्ट लाइफ आधी कंपन्यांनी एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात वाढीव किंमतीसह नवीन चर्म इन्शरन्स उत्पादने सादर करण्याची परवानगी विमा नियामक 'इर्डा'कडे मागितली आहे. रिकोरोनाकाळातच कंपन्यांनी रिइन्शुरन्सच्या दरांमध्ये वाढ केली आहे. रिइन्शुरन्स कंपन्यानी सेवेचे दर वाढविल्याने विमा कंपन्यांना आता प्रीमियम वाढविण्याशिवाय तरणोपाय नाही. 

काय असतो टर्म इन्शुरन्स?
टर्म इन्शुरन्स सर्वसामान्यांना परवडेल असा इन्शुरन्स प्लॅन असतो. जो आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आकस्मित घटनेपासून आर्थिक सुरक्षा देतो. पॉलिसीधारकाचा आकस्मिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यानंतर  नॉमिनीला गलेलठ्ठ रकम मिळते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT