Tesla Bot 
अर्थविश्व

'टेस्ला बॉट'चं लवकरच लॉन्चिग; करणार माणसांची सर्व कंटाळवाणी कामं

टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांची माहिती

सुमित बागुल

मुंबई : अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी 'टेस्ला' पुढील वर्षी 'टेस्ला बॉट' लॉन्च करणार आहे. 'टेस्ला बॉट' हा एक रोबोट असेल जो अशी सगळी कामे करेल, जी सामान्यतः लोकांना करायला आवडत नाहीत. उदाहरणार्थ किराणा आणणे आदी. माहिती कंपनीचे सीईओ अॅलन मस्क यांनी ही माहिती दिली.

या रोबोट्सची उंची माणसाच्या उंचीइतकीच असेल असं मस्क यांनी स्पष्ट केलंय. हा रोबोट कारमध्ये बोल्ट जोडण्यापासून किराणा दुकानातून सामान आणण्यासारखी सगळी कामे करेल. यामुळे माणसाचा वेळही वाचेल. हा रोबोट कामगारांची कमी भरुन काढण्याचं काम करेन. या यंत्र मानवाची किंमत माफक असावी याचाही कंपनी विचार करत आहे. 'टेस्ला बॉट'चं मॉडेल रोबोट पुढील वर्षी उपलब्ध होऊ शकतं. यामुळं टेस्लाची कदाचित जगातील सर्वात मोठी रोबोटिक कंपनी म्हणून गणना होऊ शकते असंही मस्क यावेळी म्हणाले.

अमेरिकेच्या सुरक्षा नियामकांनी या आठवड्याच्या सुरुवातीला टेस्लाच्या ड्रायव्हर सहाय्यक प्रणालीच्या चाचणीला सुरुवात केली आहे. टेस्लाच्या पूर्णतः सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टीमच्या दाव्याची चौकशी फेअर ट्रेड कमिशनकडून करण्याची मागणीही अमेरिकन सिनेटर्सनी केली आहे.

मात्र, मस्क यांनी टेस्लाच्या तंत्रज्ञानाच्या सुरक्षेवर भाष्य केलेलं नाही. कारमध्ये कॅमेरे आणि कॉम्प्युटर वापरण्यापेक्षा अधिक सुरक्षिततेसह पूर्णपणे सेल्फ-ड्रायव्हिंगपर्यंत पोहोचण्याचा आपल्याला विश्वास असल्याचंही मस्क यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT