Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

केमिकल इंडस्ट्रीचा 'हा' शेअर देईल, रग्गड परतावा...जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Stock to Buy: शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी एक उत्तम शेअर निवडला आहे. केमिकल इंडस्ट्रीमधील अतिशय दर्जेदार असा बालाजी अमाइन्सचा (Balaji Amines) स्टॉक असल्याचे त्यांनी म्हटले.

बालाजी अमाइन्समध्ये (Balaji Amines) गुंतवणुकीचा सल्ला

2012-13 मध्ये हा शेअर 60 ते 90 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत होता. तेव्हाही त्यांनी हा स्टॉक घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यांनी ज्यांनी हा सल्ला ऐकला त्यांना मजबूत फायदा झाला. गेल्या काही दिवसांत तर हा शेअर 5000 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता आणि तिथून करेक्ट होऊन 3260 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणूनच अनेक कारणांमुळे हा त्यांचा आवडता स्टॉक आहे.

मार्च 2012-13 मध्ये, बालाजी अमाइन्सचा (Balaji Amines) पीएटी (Profit After tax) 12-13 कोटी होता, पण आज टीटीएमच्या (Trailing Twelve Months) आधारावर PAT सुमारे 330 कोटी रुपये झाला आहे. कोरोनाचा फटका बसला असूनही तो चांगला व्यवसाय करत आहे. काळानुसार त्यात बरेच बदलही झाले आहेत. त्याच्या अनेक सेगमेंटमध्ये हा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे. त्याच वेळी, हा एक oligopolistic उद्योग आहे ज्यामध्ये फारशी स्पर्धा नाही. पण या क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्या आहेत.

बालाजी अमाईन्स लिमिटेड (Balaji Amines ltd)-

सीएमपी (CMP) - 3287.95 रुपये

टारगेट (Target) - 3650/3750 रुपये

बालाजी अमाईन्स लिमिटेड ही भारतातील ॲलिफॅटिक अमाईन्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी मिथाइल अमाइन्स, इथाइल अमाइन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्पेशॅलिटी केमिकल्स आणि नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये आहे. कंपनीचा व्यवसाय तीन भागात विभागलेला आहे. अमाईन्स, स्पेशॅलिटी केमिकल्स आणि डेरिव्हेटिव्ह्ज असे ही 3 विभाग आहेत.

FII मधील स्टेक वाढला

गेल्या काही वर्षात कंपनीने मार्जिनचा बराच विस्तार केला आहे. त्याच वेळी, काही तिमाहींमध्ये FII ची हिस्सेदारीही वाढली आहे. त्यामुळेच जैन यांनी गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे यात डाउनसाइड रिस्क खूपच कमी आहे. बालाजी अमाईन्स सध्या चांगल्या पातळीवर आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT