Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

'हा' केमिकल स्टॉक येत्या 1 वर्षात तब्बल 75 टक्के वाढेल, तज्ज्ञांना विश्वास

शिल्पा गुजर

केमिकल स्टॉक झुआरी ग्लोबल लिमिटेड (Zuari Global Ltd) 90 रुपये प्रति शेअरवरून सुमारे 160 रुपयांपर्यंत वाढला आहे, गेल्या एका वर्षात 75 टक्क्यांनी हा शेअर वाढला आहे. झुआरी ग्लोबलच्या शेअर्सवर गेल्या काही ट्रेडिंग सत्रांपासून विक्रीचा दबाव आहे. या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता शेअर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या शेअरमध्ये276 रुपयांपर्यंत जाण्याची क्षमता असून 1 वर्षाच्या कालावधीत 75 टक्क्यांनी आणखी वाढ होईल असे तज्ज्ञांचे मत आहे.

झुआरी ग्लोबलचा साखर आणि इथेनॉल व्यवसाय पुढेही मजबूत राहील अशी अपेक्षा असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. चांगला ट्रॅक रेकॉर्ड आणि मॅनेजमेंट मजबूत आहे. कंपनी आता फॉरवर्ड इंटिग्रेशन अंतर्गत डिस्टिलरी व्यवसायात आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे त्याचा नफा आणि मार्जिनवर चांगला परिणाम दिसून येईल. याशिवाय साखरेच्या दरात वाढ झाल्याने निर्यात व्यवसायातही वाढ होण्यास फायदा होईल. झुआरी ग्लोबल आपल्या लँड बँकेच्या कमाईवर देखील लक्ष केंद्रित करत आहे.

या केमिकल स्टॉकचा चार्ट खूप मजबूत दिसत असल्याचे आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले. 120 रुपयांच्या स्टॉप लॉससह हा स्टॉक 130-135 रुपयांना खरेदी करावा असेही त्यांनी सांगितले. अल्पकालीन व्यापारी रु. 175-180 च्या पातळीवर नफा बुक करू शकतात.

याच वेळी, हा स्टॉक लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून खरेदी करा असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. हा स्टॉक 3-4 तिमाहीच्या कालावधीत 235-276 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT