EPF Sakal
अर्थविश्व

EPF व्याज : मोदी सरकार 6 कोटींहून अधिक लाभार्थींना देणार दिवाळी भेट

EPF व्याज : मोदी सरकार सहा कोटींहून अधिक लाभार्थींना देणार दिवाळी भेट! तुमची शिल्लक असे तपासा

श्रीनिवास दुध्याल

वित्त मंत्रालयाने जाहीर केले आहे, की 2020-21 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.5 टक्के व्याज लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल.

EPFO आपल्या सहा कोटींहून अधिक लाभार्थ्यांना दिवाळी भेट देणार आहे. वित्त मंत्रालयाने (Ministry of Finance) जाहीर केले आहे, की 2020-21 साठी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) ठेवींवर 8.5 टक्के व्याज लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल. तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. याशिवाय तुमचा UAN आणि पासवर्डद्वारे पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये Download / View Passbook वर क्‍लिक केल्यानंतर तुमचा ईपीएफ पासबुक तुमच्या समोर उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम दिसेल.

कामगारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 साठी मागील वर्षीप्रमाणेच 8.5 टक्के व्याजदर मंजूर केला होता. मात्र, कामगार मंत्रालयाला प्रस्तावित व्याजदराला अर्थ मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागेल. या महिन्याच्या सुरुवातीला कामगार मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ही प्रक्रिया जलद करण्यास सांगितले.

EPFO ने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 70,300 कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला होता, ज्यामध्ये त्याच्या इक्विटी गुंतवणुकीचा काही भाग विकून सुमारे 4,000 कोटी रुपये आणि कर्जातून 65,000 कोटी रुपयांचा समावेश होता.

असे तपासा एसएमएसद्वारे शिल्लक

ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल. त्याचवेळी उमंग ऍप उघडा आणि EPFO वर क्‍लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्‍लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्‍लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही EPF शिल्लक पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT