IPO IPO
अर्थविश्व

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचाही IPO लवकरच येणार

कंपनीने सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.

शिल्पा गुजर

कंपनीने सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने (TVS Supply Chain Solutions) आयपीओसाठी (IPO) सेबीकडे अर्ज केला आहे. आयपीओद्वारे सुमारे 5000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. यासाठीच कंपनीने सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. सेबीच्या (SEBI) मंजुरी प्रक्रियेला साधारणतः 2 ते 3 महिने लागतात.

कंपनीची योजना

सध्याच्या शेयरहोल्डर्समध्ये त्याची संस्थापक कंपनी TVS मोबिलिटी, इन्व्हेस्टर्स गेटवे पार्टनर्स आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांचा समावेश आहे. ड्राफ्ट प्रॉस्पेक्टसनुसार, IPO मध्ये 59.48 दशलक्ष शेअर्स विकण्याची योजना आहे. चेन्नईस्थित या कंपनीने आपले काही कर्ज फेडण्याची योजना आखली आहे.

ग्राहकांमध्ये सुप्रसिद्ध कंपन्या

कंपनीच्या ग्राहकांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, डेमलर इंडिया कमर्शियल व्हेहिकल्स, सोनी इंडिया आणि ह्युंदाई मोटर इंडिया यांचा समावेश आहे. कंपनीच यूके, स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरमध्येही आहे.

कंपनीने त्यांच्या अहवालात सल्लागार रेडसीरच्या डेटाचा हवाला दिला आहे. भारतीय लॉजिस्टिक मार्केटमध्ये थेट खर्च मार्च 2026 पर्यंत दुप्पट $ 365 अब्ज इतका होण्याची शक्यता असल्याचे त्यात म्हटले आहे.

शेअर विक्री मॅनेजमेंट

जेएम फायनान्शियल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट बँक शेअर विक्री मॅनेज करत आहेत. त्याच वेळी, त्यात बीएनपी परिबा, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इक्विरस कॅपिटल यांचाही समावेश आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

SCROLL FOR NEXT