share market
share market sakal media
अर्थविश्व

Share Market | सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी

शिल्पा गुजर

आज कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल

बुधवारी सेन्सेक्स (Sensex) 657.39 अंकांच्या म्हणजेच 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 58,465.97 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 197.05 अंकांच्या अर्थात 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 17463.80 वर बंद झाला. बुधवारी, PSU बँका वगळता जवळपास सर्वच क्षेत्रातील खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार (Share Market) सलग 2 दिवस वाढीसह बंद झाला.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारपेठेतही चांगले वातावरण राहिले, असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. येत्या आठवड्यातील आगामी पतधोरण बैठकीत व्याजदरात कोणताही बदल होईल, या आशेने बँकिंग, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी झाली.

शेवटच्या तासातील इंट्राडे ब्रेकआउट फॉर्मेशन नजीकच्या भविष्यातही तेजी राहील याचे संकेत देत आहेत असे चौहान म्हणाले. याशिवाय निफ्टीने इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन होल्ड केला आहे, हे सुद्धा चांगले संकेत आहेत. ट्रेंड फॉलो करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी 17365 ही महत्त्वाची पातळी असेल. जर निफ्टी याच्या वर गेला तर त्यात 17550-17625 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17350 च्या खाली घसरला तर 17300-17240 ची पातळी दिसण्याची दाट शक्यता आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीने डेली चार्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी पॅटर्न तयार केल्यावर हिरवी कँडल तयार केली आहे, जे शॉर्ट टर्ममध्ये तेजीचे रिर्वसल संकेत आहेत. वर निफ्टीसाठी 17530 वर रेझिस्टन्स दिसत आहे. जर निफ्टी 17550 च्या वर गेला तर यामध्ये 17,775-17,800 ची पातळी पाहू शकतो. खाली , निफ्टीला 17315 वर सपोर्ट आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- कोल इंडिया (COALINDIA)

- मारुती (MARUTI)

- इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC)

- श्री सिमेंट (SHREECEM)

- हिंदालको (HINDALCO)

- पेज इंडिया (PAGEIND)

- भारत फोर्ज (BHARATFORG)

- अशोक लेलँड (ASHOKLEY)

- फेडरल बँक (FEDERALBNK)

- ए यू बँक (AUBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT